
लॅपटॅाप चोरटा भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…
अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरी करणारा आरोपी,भारती विद्यापीठ पोलीसांचे ताब्यात….
पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारीयव अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार निलेश खैरमोडे व विठ्ठल चिपाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, एक इसम कात्रज तलाव येथे चोरीचा लॅपटॉप विक्री करीत आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज तलाव येथे जावुन पाहता तेथे मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे रोहीत शंकर साठे, वय २० वर्षे, रा. गुजरवाडी, खोपडेनगर, कात्रज, पुणे हा अॅपल कंपनीच्या महागडया लॅपटॉपसह व दोन मोबाईल फोनसह मिळुन आल्याने त्याचेकडे तपास करता त्याचे ताब्यातील अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप हा भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८२४/२०२३,भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीकडुन ४,५०,०००/- रुपयांचा एक अॅपल कंपनीचा लॅपटॉप व २५,००० रुपयांचे दोन मोबाईल फोन असा एकुण ४,७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी रितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह आयुक्त, पुणे शहर), प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ २,नारायण शिरगावकर सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार निलेश खैरमोडे, विठ्ठल चिपाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.




