दुचाकी चोरणारी बंटी बबलीची जोडी भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या वंटी बबलीचा पर्दाफाश करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांनी यश…

पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाहन चोरांचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार महेश वारवकर, निलेश ढमढेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, स्वामी नारायण मंदीर येथे एक इसम वाहन
चोरीची गाडी घेवुन थांबला आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी स्वामी नारायण मंदीर येथे जावुन
तेथे सापळा रचुन थांबले असता इसम नामे रोहन श्रीराम पाठक, वय २० वर्षे, रा. फ्लॅट नंबर ५१०, नवीन बिल्डींग, स्वामी
नारायण मंदीराचे मागे, नऱ्हे गाव, पुणे मुळ गाव धनगर गल्ली, आंबेजोगाई, जि. बीड हा त्याचे ताव्यात स्प्लेंन्डर दुचाकी गाडी
क्रमांक MH13AW6810 हिच्यासह मिळुन आल्याने त्या गाडीबाबत तपास करता त्याने सदरची गाडी त्याची मैत्रिण
सायली कदम हिच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. सदरची गाडी ही भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७८९/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा उघडकीस आला आहे.
अटक आरोपीताकडे अधिक तपास करता त्याने व त्याची मैत्रिणीने कात्रज भागातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंवर ८४४/२०२३ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेली स्प्लेंन्डर दुचाकी गाडी, तिचा नंबर MH12RD0366 ही जप्त केली आहे. वरील प्रमाणे आरोपीतांकडुन ९५,०००/- रुपयांचे २ दुचाकी वाहने जप्त करून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७८९/२०२३, भादंवि कलम ३७९
२) भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८४४ / २०२३, भादंवि कलम ३७९
सदरची कामगिरी  रितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह आयुक्त, पुणे शहर), प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ २,  नारायण शिरगावकर ,सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, बापु भिंगारे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!