तु माझ्याशी लग्न का करत नाही,म्हनुन खासगी फोटो केले व्हायरल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे-(प्रतिनिधी) –  मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस
वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका २० वर्षांच्या तरुणीचे खासगी फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार पुण्यातील शिवाजीनगर परिसरात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडला. याबाबत २० वर्षांच्या तरुणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र रामुलु पागे (रा. सिरोंचा, गडचिरोली) याच्यावर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.





याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी रवींद्र पागे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तरुणीला
वारंवार फोन करुन लग्नाची मागणी घातली.दरम्यान, तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुला इतर कोणाची होऊ देणार नसल्याची धमकी त्यांनी फिर्यादी तरुणीला दिली. रागातून दोघांचे खासगी फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. असे कृत्य करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल केकाण करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!