विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्यास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…
देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्याा इसमास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१५/०१/२०२४ रोजी संध्याकाळी ७.०० वा. चे सुमारास पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील पोलिस अंमलदार अनिस शेख व शिवदत्त गायकवाड यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्वारगेट कॅनॉल जवळील पाटबंधारे ऑफीस समोरील झाडाशेजारी एक इसम स्वतःजवळ पिस्तुल बाळगुन थांबला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रशांत संदे सहा पोलिस निरीक्षक व प्रतापसिंह शेळके पोलिस उप निरीक्षक यांना माहिती दिली असता त्यांनी सुनिल झावरे वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वारगेट पो.स्टे. यांना
बातमीबाबत माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्यावरुन तपास पथकातील स्टाफसह बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करुन सापळा रचुन
सिद्धेश नितीन धुमाळ वय २२ वर्षे धंदा मजुरी रा. ६७४, बालगुडे जीमसमोर, घोरपडी पेठ पुणे
यास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याचे विरुध्द स्वारगेट पोलिस स्टेशन गु.र.नं. १४/२०२४ भारतीय हत्यार
कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) ( ४ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील,अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. स्मार्तना पाटील ,पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर.नारायन शिरगावकर, सहा पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे, वरिष्ठ
पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता पाटील यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, व पोहवा विजय कुंभार, पोलिस अंमलदार शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, दिपक खेंदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे, संजय मस्के यांनी एकत्र मिळुन केली आहे.