
प्रवाशांचे दागीने मौल्यवान वस्तु चोरणारी महीला स्वारगेट पोलिसांचे तावडीत सापडली,उघड केले ५ गुन्हे…
स्वारगेट बस स्थानकावरुन येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद….
पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन
स्वारगेट पुणे येथील शहर गु.र.नं.३० / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ मधील फिर्यादी नामे भगवान शेटीबा आतार वय ५६ वर्षे, धंदा –मिस्त्री काम रा. रुम नं. १० सिद्धीनाथ सोसायटी पिंपरी पाडा
सर. डी. एस. हायस्कुल जवळ मालाड (इस्ट) मुंबई हे दिनांक २९ रोजी रोजी स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना मोठया प्रमाणाव गर्दी होती सदर गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेनेबाबत वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी स्वतः तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना आदेशीत केले होते.
त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा पोलिस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड यांनी
स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे जावुन स्वारगेट एस. टी. स्टँन्ड परीसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलींग करीत असताना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीप्रमाणेच दिसनारी एक संशयीत महिला स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परीसरात दिसुन आल्याने लागलीच महिला पोलिस अंमलदार खामगळ यांना बोलावुन घेवुन तीचे दिशेने जाताच ती पळुन जावु लागल्याने वर नमुद पोलिस स्टाफच्या मदतीने तिचा पाठलाग करुन तिला घेराव घालुन शिताफीने ताब्यात घेतले तिला तीचे नाव व पत्ता विचारता तिने तिचे नाव व पत्ता कार्तीका शरमा चव्हाण वय ३० वर्षे धंदा रोजंदारी रा. गाडेवस्ती खानापुर ता. शेवगाव जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले तीचेकडे सदर गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने तीला अटक करुन तपासादरम्यान तिचेकडुन २,३०,००० /- रुपये किंमतीचे ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहे. तसेच गेले १५ दिवसामध्ये स्वारगेट पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ०४ गुन्हे व मोबाईल चोरीचा ०१ गुन्हे उघडकीस आले असुन सदर गुन्हयांमध्ये ०३ महिला आरोपी व ०३ पुरुष आरोपी
यांना अटक करुन त्यांचेकडुन तपासादरम्यान एकुण ३,६०,०००/- रुपये किंमतीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व २,०५,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण १६ स्मार्ट फोन असे मिळुन एकुण ५,६५,०००/- किंमतीचा मौल्यवान व किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही रितेश कुमार पोलिस आयुक्त पुणे, प्रविणकुमार पाटील ,अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर. श्रीमती नंदिनी वग्यानी,सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, तपास पथकातील अंमलदार, सुजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, विजय कुंभार, सोमनाथ कांबळे, संदीप मुंढे, तात्या देवकाते, दिपक खंदाड, संजय मस्के, महिला पोलिस शिपाई सुनिता खामगळ यांनी एकत्र मिळुन केली आहे.




