कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच…

पिंपरी चिंचवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून केवळ गुन्हे उघडकीस आणले नसून पहिल्यांदाच मोठ्या ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील आरोपींना जेरबंद केले आहे. या टोळीने देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे या मध्ये उघड झाले आहे.





पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देणारी टोळी आता गजाआड झाली आहे. परंतु अनोळखी आरोपींची ओळख पटली नसल्याने गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर आव्हान होते. गुन्हा कितीही गंभीर असला तरी पण त्या गुन्ह्याच्या तपासात सातत्य ठेवल्यास त्याची उकल होतेच. हे पोलिसांनी दाखवून दिले आहे. हॉटेल, उपहारगृहाला रिव्ह्यू, रेटिंग देण्याची नोकरी असल्याचे सांगत वेगवेगळे ऑनलाईन टास्क देऊन कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.



हॉटेल आणि उपहारगृहाला रिव्ह्यू, रेटिंग देण्याची नोकरी असल्याच्या बहाण्याने वेगवेगळे ऑनलाइन टास्क देऊन कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखा युनिट ४ च्या पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी तब्बल १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १७ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी ९५ बनावट बॅंक खात्यांमधून २०० कोटींचे व्यवहार करत फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील फसवणूक झालेल्या नागरिकांची तब्बल साडेतीन कोटींची फसवूक करण्यात आली आहे.



चिंतन शशिकांत फडके (वय ३५, रा. मध्यप्रदेश), ब्रजराज रामरतन वैष्णव (वय १८, रा. राजस्थान), सुंदरदास चेदनदास सिंधी (वय २४, रा. राजस्थान), राजेश भगवानदार करमानी (वय २६, रा. राजस्थान), मोहम्मद रशिद चांद मोहम्मद (वय ४७, रा. राजस्थान), अभिषेक सत्यनारायण पाराशर (वय २४, रा. राजस्थान), आशिष प्रल्हादराय जाजू (वय ३५, रा. कोंढवा), मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद (वय २४, रा. अजमेर), नवीनकुमार नेवंदराम आसनाणी ( वय ४० रा. राजस्थान ), विकास सत्यनारायण पारिख (वय २९, रा. राजस्थान), सुरेश गोवर्धनदास सिंधी (वय ३२, रा. राजस्थान), गौरव महाविर सेन (वय ३१, रा. राजस्थान), ललित नवरतन मल पारिख (वय ३३, रा. राजस्थान), मनिष ऋषिकेश वैष्णव (वय ३३, रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिस ठाण्यात एका महिलेने ऑनलाईन टास्क फ्रॉडद्वारे तिची ७१ लाख ८२ हजार ५२० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती. हा गुन्हा गंभीर आणि तांत्रिक स्वरुपाचा असल्याने या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ४ कडे देण्यात आला होता. युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर आवताडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक अंबरिष देशमुख, पोलिस उपनिरिक्षक गणेश रायकर यांनी तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याचा तपास सुरु केला. यामध्ये आरोपींनी ऑनलाईन फ्रॉडसाठी वेगळीच पद्धत वापरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तपासामध्ये आरोपींनी तीन पद्धतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पहिल्या स्तरावर यातील आरोपी हे गरीब गरजू व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत अकाऊंट व फर्म तयार करत होते. दुसऱ्या स्तरावर आरोपी तयार केलेल्या बँक खाते व किट चेकबुक व इंटरनेट बँकींग विकत घेत होते. तर तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे व्हॉट्सॲप व टेलिग्रामच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करत होते. त्यांना ऑनलाईन टास्क देऊन त्याच्या मोबदल्यात पैशांचे आमिष दाखखून तयार केलेल्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत होते.

या गुन्ह्याचा खोलात जाऊन तपास करत तसेच आरोपींची गुन्ह्याची पद्धत समाजावून घेत पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली. त्यानुसार मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये जाऊन १४ आरोपींना जेरबंद केले. या कारवाईनंतर ऑनलाईन टास्क फ्रॉडचे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच हे गुन्हे करण्यासाठी आरोपींनी ९५ बनावट बॅंक खाते उघल्याचेही समोर आले आहे. हिंजवडी, वाकड, चिंचवड पिंपरी, आळंदी, चिखली, अवधुतवाडी, पुर्व विभाग सायबर पोलिस, दक्षिण विभाग सायबर पोलिस, सायबर क्राईम पोलिस ठाणे, सेंट्रल सायबर पोलिस ठाणे बेंगलोर, सायबर क्राईम पोलिस ठाणे आगरा, सायबर क्राईम पोलिस ठाणे हावडा या पोलिस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत.

अशा प्रकारे ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे सतिश माने, सहाय्यक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे सहायक पोलिस निरीक्षक अंबरीष देशमुख, सिद्धनाथ बाबर, पोलिस उपनिरीक्षक गणेश रायकर, आबासाहेब किरनाळे, पोलिस अंमलदार नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिळाळ, प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलिस निरीक्षक सागर पानमंद, पोलिस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस अंमलदार नागेश माळी, नितेश बिचेवार, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!