मांजरीच्या तथाकथित भाईंवर पुणे पोलिसांनी केली मोक्का कायद्यानुसार केली कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे -सवीस्तर व्रुत्त असे की  हडपसर परिसरात नागरिकांना दमदाटी करुन जबरी चोरी करणाऱ्या तसेच दहशत माजवून धाक
दाखविणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या ५ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आजपर्यंत ७० संघटित गुन्हेगारी
टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

सराईत गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार करुन अमोल आडेगावकर याने हडपसर, मांजरी परिसरात दहशत माजवली होती वर्चस्व वादातून संघटीत तसेच संयुक्तपणे गुन्हे केले. गुन्हेगारी टोळीने खून, शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे,
घरफोडी, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, शस्त्राचा धाक दाखवून पैसे मागणे, लहान मोठे व्यवसायिक तसेच पथारीवाले यांना दमदाटी करणे, अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.





दरम्यान, गुन्ह्याचा तपास हडपसर पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस करीत असताना, युनिट ५ च्या पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल बाळासाहेब आडेगावकर (वय ३०, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक,
पुणे),



रोहन भगवान थोरात (वय-२०, रा. मांजरी बुद्रुक), गणेश गौतम कोरडे (वय-२२, रा. म्हातोबाची आळंदी),



आशितोष विक्रम गजरे (वय-२२, रा. रंगीचा ओढा, मांजरी),

मंगेश गणेश मोरे (वय-२२,रा. कल्याणी स्कूलजवळ, मांजरी)

यांना सापळा रचून अटक केली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मांजरी रस्त्यावरील नवीन ओव्हर ब्रिजवर मोबाईल पाहत थांबले असता, तीन अनोळखी
व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. एकाने त्यांना पकडले आणि दोघांनी हातातील मोबाईल हिसकावला. आम्ही या परिसरातले भाई आहोत.  आमची तक्रार केली, तर तुम्हाला मांजरीमध्ये राहू देणार नसल्याची धमकी दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!