पुणे ड्रग तस्करीतील मुख्य आरोपी ललीत पाटील खरचं नेपाळला पळाला का ?? पुणे पोलिस त्याच्या मागावर…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुणे – ससुन रुग्णालयातून पसार झालेला कुप्रसिद्ध ड्रग तस्कर ललितपाटील ससून रुग फरार झाल्यानंतर अजुनही त्याचा शोध लागलेला नाही. ललित पाटीलने नेपाळला पळुन गेल्याची दाट शक्यता  वर्तविण्यात येत आहे. ललितचा भाऊ भूषण पाटील
आणि साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने आणि गुन्हे शाखेच्या पथकाने नेपाळ सीमेलगत मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ललीत पाटीलचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ललीत पाटील याला पकडण्यासाठी
पुणे पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. विशेष पथकासह गुन्हे शाखेची दहा पथके ललीत पाटीलच्या मागावर आहेत. नेपाळच्या सीमेवरून अटक केलेल्या दोन अंमली पदार्थ तस्करांसह ललित पाटील याचे मेफेड्रॉन उत्पादन, विपणन आणि विक्रीचे मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता असून,
त्याबाबत तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

पोलिसांची दहा पथके ललित पाटील याचा शोध घेत आहेत. दुबई, थायलंड आणि मलेशिया या देशांमध्ये ललित पाटील मेफेड्रॉन पाठवत होता. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरातील शिंदे गावात ललीत पाटीलचा भाऊ भूषण पाटील याच्या कारखान्यावर छापा टाकला.आणि तेथुन  मुंबई पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले.ललीत पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आल्यानंतर ललीत पाटील नेपाळमध्ये
पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे ललीत पाटीलचा शोध घेण्यात येत आहे. ललीत  पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर अंमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी देशातील अनेक तस्करांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात उघड झाली.
या कारवाईनंतर भूषण पाटील उत्तर प्रदेशात पसार झाला. गोरखपूर भागात नेपाळ सीमेजवळ भूषण पाटील असल्याची माहिती तांत्रिक
तपासात मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले. एका लॉजमधून भूषण पाटील आणि अभिषेकला बलकवडे याला ताब्यात घेण्यात आले. दोघे नेपाळला पसार होण्याच्या तयारीत होते. उत्तर प्रदेशातून ललीत पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.दरम्यान, आरोपींकडे सापडलेल्या मोबाइलमधील डेटा त्यांनी फॉरमॅट केला आहे. तो डेटा सायबर तज्ज्ञांकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे  आरोपींनी अंमली पदार्थांच्या विक्रीतून किती स्थावर आणि जंगम मालमत्ता जमा केली आहे, त्याचाही तपास पोलिस करीत आहेत.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!