घरफोड्या आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील म्होरक्या गजाआड…
घरफोड्या आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील म्होरक्या गजाआड…
पुणे (ग्रामीण प्रतिनिधी) – पुणे ग्रामीण जिल्हयाचे उत्तर सीमेलगत शिरूर, आळेफाटा, शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी यांसारखे गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. तेव्हा पंकज देशमुख पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, यांनी सदर गुन्हयांचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडून सदर गुन्हयांचा तपास चालू असताना गुन्हयाची कार्यपद्धती पडताळण्यात आली तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील पाहीजे असलेला गुन्हेगार नामे रमेश मोतीलाल काळे रा.मोहरवाडी, कोळगाव-घारगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर हा त्याचे टोळीतील सदस्यांना घेऊन पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर, आळेफाटा, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे हद्दीत मालमत्ता चोरीचे गुन्हे करत आहे, तसेच त्यांचे टोळीत सात वर्षे जेल भोगून आलेला गुन्हेगार नामे- बाब्या ऊर्फ सुहास डबक्या ऊर्फ लालकुश काळे रा. मोहरवाडी ता. श्रीगोंदा ,जि.अहमदनगर हा सामील झाला आहे, अशी माहिती मिळाली होती.
त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हेगारांचा मागोवा घेतला असता ते गुन्हे करून वारंवार गावे बदलून राहत आहेत, तसेच सध्या वाघोली परीसरात राहणेस आले असून ते कोरेगाव भिमा परीसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने वरीष्ठांचे परवानगीने पोलिस स्टेशनकडील पोलिस पथकाचे मदतीने (दि.13फेब्रुवारी) रोजी सापळा रचून गुन्हेगार नामे 1) रमेश मोतीलाल काळे, (वय ५४ वर्षे), २) बाब्या ऊर्फ सुहास डबक्या ऊर्फ लालकुश काळे, (वय २५ वर्षे), रा.मोहरवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर यांना त्यांचे ताब्यातील मोटार सायकलसह ताब्यात घेतले. रमेश काळे हा या पुर्वीचे दरोडयाचे चार गुन्हयांत पाहीजे असलेला आरोपी असून त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांचे ताब्यातील मोटार सायकल चोरीची असल्याचे समजले.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि योगेश लंगुटे, सपोनि कुलदीप संपकाळ, पोउपनि गणेश जगदाळे, अमित सिद पाटील, शिक्रापुर पो.स्टे पोउपनि महेश डोंगरे, रांजणगाव पो.स्टे पोउपनि तिडके, शिरुर पो.स्टे एकनाथ पाटील, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशनचे पो.हवा तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजु मोमीन, संजय जाधव, योगेश नागरगोजे, अतुल डेरे, बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, असीफ शेख, सचिन घाडगे, अजित भुजबळ, अजय घुले, मंगेश थिगळे, मंगेश भगत, संतोष औटी, संतोष पवार, विजय शिंदे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रघु होळनोर, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, विकी यादव, मपोशि सात्रस, मपोहवा गायकवाड यांनी केली आहे.