
तु मला खायला फुकट अंडाभुर्जी का देत नाही म्हनुन विक्रेत्याचा खुन..
बारामती शहर पोलिस (पुणे ग्रामीण ) : सवीस्तर व्रुत्त असे की एका शुल्लक कारणांवरून अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासादरम्यान
उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.आरोपीला अटक करण्यात आली आहे शाहबाज रौफ पठाण (वय – ३२ रा. सदगुरु नगर, पाटस रोड ता. बारामती), असे खून झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. तर प्रवीण भानुदास मोरे (वय ३६ रा. कल्याणी नगर तांदुळवाडी ता. बारामती)
असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील टि सी कॉलेज रस्त्यावर शनिवारी
३० रोजी पठान हा अंडा भुर्जी विक्री करीत होता. त्याला अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने गंभीर जखमी केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करणेत आला होता. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना रविवारी (ता. ०८) त्याचा म्रुत्यु
झाला होता. त्यासंबंधी पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी ४ पोलिस पथक तयार केली होती गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस अंमलदार दशरथ इंगोले व अक्षय सिताप यांनी तांत्रिक विश्लेषण
तसेच गुन्हा घडले ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दरम्यान, यावेळी शहाबाज पठाण यास दारूचे नशेत फुकट अंडी देण्याबाबत एकाने वाद घातल्याची
माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे माहिती काढून पोलिसांनी प्रवीण मोरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून बारामती शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


