
सहा पोलिस अधिक्षक लोणावळा यांची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ॲार्केष्ट्रा बारवर कार्यवाही…
सहा.पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने केली नियमांचे उल्लघन करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर बेधडक कार्यवाही….
लोणावळा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त तक्रारीनुसार गोपनीय खबरेवरुन दि १० जानेवारी रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री दिलेल्या नियमांचे उल्लघन करणार्या कामशेत येथील १)दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी पोलिस पथकाने छापा टाकला


सदर छाप्यामध्ये बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे बारमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई.ची विक्री करताना तसेच वाद्य,ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला असताना मिळुन आल्याने नमूद दोन्ही बार चालकांवर भारतीय न्याय संहिता चे कलम २२३ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम ३३(डब्ल्यू) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलिस स्टेशन वडगाव मावळ हे करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस अधीक्षक उपविभागिय पोलिस अधिकारी,लोणावळा सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह केली आहे.



