सहा.पोलिस अधिक्षक लोनावळा यांचा अवैध गांजा व गुटखा विक्रेत्यांवर छापा…
सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी कार्यवाहीचा तडाखा, 3 किलो गांजा व प्रतिबंधित गुटखासह सुमारे 3 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमालासह पाच आरोपींना घेतले ताब्यात….
लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळ्याचे सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची तडाखा सुरूच ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अंमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणार्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.या अभियानाचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमलीपदार्थ विकणार्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
त्याअनुषंगाने दिनांक 21/9/2024 रोजी मध्यरात्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील भैरवनाथ नगर कुसगाव बु. परीसरात राहणारे काही इसम त्यांचे राहते घरातुन गांजा व प्रतिबंधीत गुटखा त्यांचे ओळखीचे लोकांना विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सत्यसाई कार्तिक यांनी रात्रीपासूनच भैरवनाथनगर परिसरात त्यांचे पथकासह सापळा रचला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.21/9/2024 रोजी रात्री 00:09 वाजताच्या सुमारास लक्ष्मी लॉंड्रीजवळ भैरवनाथनगर, कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे येथे मिळालेले बातमीचे ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी 3 इसम मिळुन आलेले असुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावला पोलिस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इसमांचे ताब्यातील क्वालिस गाडी व घर झडतीमध्ये 737 ग्रॅम गांजा व नमुद इसमांचे ताब्यात असलेल्या चारचाकी वाहनामध्ये 128 पुड्डे विमल पान मसाला प्रतिबंधित गुटखा मिळुन आला आहे.
सदर कारवाईमध्ये गांजा, प्रतिबंधीत विमल पान मसाला गुटखा व चारचाकी वाहन असा एकुण 3 लाख 27 हजार 137 रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे. यातील इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल विक्री करता जवळ बाळगला असल्याचे सांगितले आहे. सदरच्या कारवाईमध्ये 1)आब्बास तपशीर खान उर्फ अरबाज वय 21 वर्ष 2) आवान आब्बास तपशिर खान उर्फ मुन्ना वय 19 वर्ष दोघे रा. लक्ष्मी लॉंड्रीजवळ, भैरवनाथनगर, कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे 3) अश्विन चंद्रकांत शिंदे वय 38 वर्ष रा. के के बाजार समोर कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरोधात पोहवा सिताराम बोकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे. येथे एनडीपीएस व इतर विविध कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.
तसेच दुसर्या एका कार्यवाहीत दिनांक 22/9/2024 रोजी मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील इंद्रायणीनगर लोणावळा येथे महिला महेमुना सत्तार कुरेशी हि आपले राहते घरातुन तिचा कामगार राजु लहु जाधव रा. इंद्रायणीनगर या हस्तकांकरवी ओळखीचे इसमांना गांजा ह्या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने पंचासमक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी 2 किलो 168 ग्रॅम गांजासह रोख रक्कम असा एकुण 59 हजार 880 रूपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन यातील इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशी मध्ये सदरचा माल विक्री करता जवळ बाळगला असल्याचे सांगितले आहे.तसेच या कारवाई मध्ये 1) महेमुना सत्तार कुरेशी वय 54 वर्ष 2) राजु लहु जाधव वय 55 वर्ष दोघे रा. इंद्रायणीनगर, लोणावळा ता. मावळ जि. पुणे यांचेविरोधात लोणावळा शहर पोलिस स्टेशनला पोशि सुभाष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस व इतर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भिसे हे करत आहेत.
अशाप्रकारे संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील दोन्ही कारवाईमध्ये अंदाजे 3 किलो गंजा, 128 प्रतिबंधित विमल पान मसाला गुटख्याचे पुड्डे व एक क्वॅालीस गाडी असा एकूण .3, 87, 000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस सखोल तपास करत आहे
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळ्याचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि प्रशांत आवारे, मसपोनि विजया म्हेत्रे, सपोनि राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक लोसरवार, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, मपो.हवा अश्विनी शेडगे, पोशि गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, गणेश ठाकुर, प्रतिक काळे , पोहवा हनुमंत वाळंज, संदिप मानकर, नापोशि हनुमंत शिदे, पवन कराड, मपोशी अक्षदा तावरे, कोमल निंबाळकर या पथकाने केली आहे.