
परी.सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांचा गुटखा माफीयांना दणका,४० लक्ष रु मुद्देमाल केला जप्त….
सराईत गुटखा माफियास ताब्यात घेवुन गुटखा व १ पिकअप वाहनासह एकुन ३०,९८,८२०/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत, सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांच्या नेतृत्वाखाली मोठी कार्यवाही….


सुपे(पुणे ग्रामीण) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/०३/२०२४ रोजी रात्री ०२ / २० वा. चे सुमारास सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड याना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बारामती तालुका पोलिस स्टेशन हद्दीत प्रशांत
गांधी यांचे घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध बेकायदेशीर पान मसाला गुटखा विक्री करीता आणलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहा. पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड व इतर पोलीस स्टाफ सह संशयित इसम प्रशांत धनपाल गांधी वय ४८ वर्षे रा. लासुर्णे ता. इंदापुर जि. पुणे सध्या रा.
ऋषिकेश अपार्टमेंट फ्लॅट नं १ पेन्शील चौक बारामती याचे घरी जावुन त्यांचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे घरी काहीएक माल मिळुन आला नाही. त्यानंतर सहा. पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यानी त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी अवैध विक्री करीता कर्नाटक राज्यातील इसम निसार, विजापुर पुर्ण नांव व पत्ता माहित नाही. याचेकडुन आणलेला पान मसाला गुटखा हा राहुल मलबारी रा. यवत ता. दौड जि. पुणे यांस देणेकरीता जात असताना गाडी नादुरूस्त झालेने उंडवडी येथील विदयुत सबस्टेशन जवळील त्याचे स्वत:चे मालकीच्या फॉर्म हाऊस मध्ये लपवुन ठेवला आहे.असे सांगितले.

त्यानंतर सहा. पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यानी सुपा पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील व पोलिस स्टाफ याना उंडवडी सुपे येथे बोलावुन उंडवडी सुपे गावचे हद्दीतील
प्रशांत गांधी याचे फॉर्म हाऊस येथे जावुन पंचासमक्ष घरझडती घेतली असता, त्या फॉर्म हाऊसमध्ये तीन खोलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधी पान मसाला गुटखा व एक पिकअप वाहन असा एकुण कि. रू ३०,९८,८२० /- रू चा मुद्देमाल मिळुन आला. सदरबाबत १) प्रशांत धनपाल गांधी वय ४८ वर्षे रा. लासुर्णे ता. इंदापुर जि. पुणे सध्या रा. ऋषिकेश अपार्टमेंट फ्लॅट नं १ पेन्शील चौक बारामती २) निसार, विजापुर, कर्नाटक पुर्ण नांव पत्ता माहित नाही. ३) राहुल मलबारी, रा. यवत ता. दौड जि. पुणे
याचेविरूध्द सुपा पोलिस स्टेशन गु.र.नं ११० / २०२४ भादवि कलम भा.द.वि कलम ३२८,९८८ तसेच अन्न, सुरक्षा आणि मानदे कायदा २००६ मधील कलम २६ (२) (i) सह कलम ३ (१) (zz ) (v) शिक्षा कलम ५९तसेच कलम २६ (२) (४) सह अन्न सूरक्षा आयुक्त यांचे दि. १८ जुलै २०१३ चे आदेश, कलम २७ (३) (डी) शिक्षा कलम २७ (३) (इ) शिक्षा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेत प्रशांत धनपाल गांधी यांस ताब्यात घेवुन त्यांस मा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक
२७/०३/२०२४ रोजी पर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली आहे. पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक,बारामती विभाग संजय जाधव,उपविभागिय पोलिस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड,यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड , सुपा पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश घोडके, लेंडवे, जिनेश कोळी, म.पो.उपनिरीक्षक देशमुख,पो.हवा काळे, पोशि. इगवले, तुषार ढावरे, सुदर्शन डोळाळकर यांनी केली आहे.


