व्यापाराच्या नावाखाली लोकांना लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी केली जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

व्यवसाय करण्यासाठी बकऱ्या विकत घेवून देण्याचा बहाणा करून दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी केली जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखा व ऊरूळी कांचन पोलिस स्टेशन पुणे ग्रामीणची कारवाई

पुणे(ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
हैद्राबाद येथील इसमास व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरात बकऱ्या घेवून देतो असे सांगून ऊरुळी कांचन येथे बोलावून घेवून त्या इसमास व त्याचे साथीदारांना बकऱ्या दाखविणेसाठी शेताकडे नेले आणि त्या ठिकाणी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचे जवळील रोख रक्कम पाच लाख रुपये, मोबाईल, गळयातील चैन असा एकुन  ५,८३,०००/- किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याबाबत अब्दुला लालबादशाह शेख वय ३० वर्षे रा. हैद्राबाद, जेडीमेटला एरीया, जि. रंगारेड्डी राज्य आंध्रप्रदेश यांनी ऊरूळी कांचन पोलिस स्टेशन गु.र.नं.७२/२०२४ भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना तपासाची भाग म्हनुन सिसिटिव्ही तपासण्यात आले. गुन्हयाची कार्यपद्धतीचा अभ्यास केला गेला व  गोपनीय बातमीदाराचे जाळे विणण्यात आले त्यानुसार गोपनीय  बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अमोल काढण भोसले रा. कोळगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याचे समजले. तसेच सदरचा गुन्हेगार हा त्याचे साथीदारांसोबत सध्या खोपोली परीसरात राहत
असल्याची बातमी मिळाल्याने त्यांचे बाबत पथकाने माहिती प्राप्त करून घेतली.
त्यानुसार दि ०६/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पो स्टे कडील पथक गुन्हयाचा तपास करत असताना संशयित गुन्हेगार अमोल भोसले हा त्याचे साथीदारांसोबत लोणावळा परीसरात आला असल्याची बातमी स्था.गु.शाखेच्या पथकाला मिळाली. बातमीप्रमाणे सापळा लावून





१) अमोल काढण भोसले वय ३२ वर्षे रा. कोळगाव पांढरेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर



२) शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय १९ वर्षे रा. वेठेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर



३) श्याम पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय २३ वर्षे रा. वेठेकरवाडी
ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर

यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.यातील आरोपी अमोल काढण भोसले यांचे विरुध्द पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हयात दरोडा, जबरी
चोरी, घरफोडी चोरीचे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे ग्रामीण, मा. अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग,उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव, दौंड विभाग, दौंड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ऊरळी कांचन पोलिस स्टेशनचे पोनि शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल गावडे, पोउपनि अमित सिदपाटील,  पाडुळे पोलिस अंमलदार सचिन घाडगे, दिपक साबळे, अजित भुजबळ, विक्रम तापकीर, योगेश नागरगोजे, राजु मोमीन,
अतुल डेरे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास ऊरळी कांचन पोलिस स्टेशन हे करत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!