जेजुरी पोलिसांचा हातभट्टीची दारु गाळणार्यांना तडाका…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांविरद्ध जेजुरी पोलिसांची धडक कारवाई, १२२५ लीटर तयार गावठी दारुसह,१०,००० लीटरचे कच्चे रसायन असे एकुण ५,२४,००० रु चा मुद्देमाल केला जप्त….

जेजुरी(पुणे) ग्रामीन प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ०४.०३.२०२४ रोजी रात्री ००:१५ वा चे सुमारस जेजुरी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, हे पोलिस स्टेशनला हजर असताना यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर
माहीती मिळाली की, ढोलेवाडी गावचे हद्दीत इसम नामे संतोष राठोड हा नाझरे धरणाचे कडेला शेतात विहीरीजवळ आडोशाला गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची भट्टी तयार करत आहे.
बातमीच्या अनुषंगाने दोन पंचांना बोलावुन घेवुन, पंचासह व पोलिस पथकासह जावुन बातमी मिळाली ठिकाणी छापा टाकला असता हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी भटी चालु असल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी ०२ लोखंडी पातेले, त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १०,००० लीटर कच्चे रसायन, ३५ लीटरचे निळे रंगाचे प्लास्टीकचे ३५ कॅन त्यामध्ये १,२२५ लीटर तयार गावठी हातभट्टी दारु, १० मन लाकडी सरपण, काळा गुळ प्रत्येकी ०१ किलो वजनाचे सुमारे १२० ढेपा, एकुण १,२०० किलो, ०१ जर्मनचा चाटु त्यास नळी असलेला, ०१ जर्मनची थाळी असा माल व तयार दारु असा एकुण ५,२४,०००/-रु. किमतीचा
माल मिळुन आला. कच्चे रसायन व जळके सायन, लाकडी सरपण साहीत्य असे जागीच नाश करण्यात आले तसेच  गावठी हातभट्टी दारु मानवी आरोग्यास अपायकारक आहे हे माहीती असुनही
दारु तयार करणारा इसम संतोष राठोड हा पोलिसांची चाहुल लागताच पळुन गेला.





सदरबाबत जेजुरी पोलिस स्टेशन गु.र नं. ९२ / २०२४ भादवी ३२८ सह दारुबंदी अधिनीयम १९४९ कलम ६५ फ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील, जेजुरी पोलिस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही  पकंज देशमुख, पोलिस अधिक्षक,संजय जाधव, अपर पोलिस अधिक्षक, बारामती, श्रीकांत पाडुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भोर विभाग सासवड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक  दिपक वाकचौरे, पोलिस
उपनिरीक्षक, महेश पाटील, पो. हवा अण्णासाहेब देशमुख, पो. शि.  प्रविण शेडे,होमगार्ड खंडागळे यांचे पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!