कमरेला गावठी पिस्टल लावुन दहशत निर्माण करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  अवैध रित्या गावठी पिस्टल, कट्टा बाळगून दहशत निर्माण करून प्रसिद्धी मिळविण्याचे प्रमाण
वाढले असल्याने अशा इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिले होते.
त्यानुसार दि ३०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरित्या विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पौड पोलिस स्टेशनचे हद्दीत हजर असताना, घोटावडे गावचे भेगडेवाडीतील रोकडेश्वर तरूण मंडळाचे तालीम जवळ एक इसम बसलेला असून त्याचे कंबरेला गावठी पिस्टल खोचलेले आहेत. अशी गोपनीय बातमी बातमीदारामार्फत पथकातील पो. ना. तुषार भोईटे यांना मिळाली होती. बातमीचे आधारे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शन व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेवून दोन पंचांसह भेगडेवाडी येथील रोकडेश्वर तरूण मंडळ तालीम जवळ बसलेल्या इसमावर छापा कारवाई करून इसम

दत्ता बाळु भेगडे, वय २६ वर्षे, रा. भेगडेवाडी, घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे





याची अंगझडती घेतली असता, त्याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व एक गावठी कट्टा असे दोन गावठी पिस्टल एकूण ५५,०००/- रू किं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. सदर प्रकरणी त्या इसमावर पौड पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
माहे सप्टेंबर २०२३ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वातुंडे गावातून दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून चार गावठी पिस्टल आठ जिवंत काडतूसे हस्तगत केली होती. त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर २०२३ या महिन्यात दोन गावठी पिस्टल घोटावडे परिसरातून हस्तगत केल्याने मुळशी तालुक्यातील लोकांकडून स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, पुणे ग्रामीण,  अपर पोलिस अधीक्षक  मितेश घट्टे ,पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक
अविनाश शिळीमकर, स.पो.नि. नेताजी गंधारे, पोलिस अंमलदार हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, महेश बनकर, अतुल डेरे, रामदास बाबर, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, तुषार भोईटे, पोकॉ मंगेश भगत यांनी केली असून पुढील तपास पौड पोलिस स्टेशन करत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!