गांजाची तस्करी करणाऱ्यास २५ किलो गांजासह केली अटक स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिसांची कार्यवाही…
दौड (पुणे ग्नामिण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/९/२०२३रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलिस स्टेशन हद्दीत गणपती उत्सव अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दौंड रेल्वे स्टेशनचे बाहेर एक इसम बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, दौंड पोलिस स्टेशन यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव, दौंड विभाग, दौंड यांचे मार्गदर्शनाखाली व पुर्वपरवानगीने स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिस स्टेशनचे पथकाने दौंड रेल्वे स्टेशन येथे जावून छापा टाकला त्यावेळी त्यांना मिळालेल्या बातमीनुसार सपन बेनीत बीर रा. अटली मा ता. नवगाडा जि. गजपती राज्य ओरिसा हा मिळून आला त्याचे ताब्यात असणारे बॅगची पंचांसमक्ष झडती घेतली असता बॅगमध्ये प्लास्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेले गट्ठयांमध्ये एकूण २४ किलो ८५ ग्रॅम अंदाजे एकूण किंमत ३,७२,७५०/- गांजा हा विक्री करण्याचे उद्देशाने त्याचे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आला सदरबाबत सहा. पोलिस निरीक्षक राहुल दत्तात्रय गावडे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी फिर्याद देउन गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे ,उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग दौंड स्वप्निल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलिस
स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सपोनी राहुल गावडे, सहा फौज हनुमंत पासलकर,पो.हवा. सचिन घाडगे, आसिफ शेख, विजय कांचन, अजित भुजबळ, हेमंत विरोळे, रामदास बाबर, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, चा सहा. फौज मुकुंद कदम यांनी केली आहे.