स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांनी उघड केला शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील केबल चोरीचा गुन्हा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुणे ः (महेश बुलाख) –  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०५/१०/२०२३ रोजी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत पोलीस उप निरीक्षक जगदाळे, सहा. पोलिस उप निरीक्षक पंदारे, पो.हवा. राजु मोमीन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे असे सरकारी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदार यांनी दिलेल्या बातमीनुसार तीन इसम हे त्यांचेकडील पांढरे रंगाचे पिकअप वाहन क्र. एम.एच ४६ ए. एफ २०९८ ही कासरी फाटा ते निमगाव म्हाळुंगी
रोड चे कडेला संशयरित्या उभी असुन सदर वाहनांमध्ये चोरीचे केबलचा माल आहे अशी माहिती मिळताच तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता पिकअप वाहनामध्ये असलेल्या तीन इसमांना पोलिस पथकाची चाहुल लागल्याने ते पळुन जाऊ लागले असता पथकाने पाठलाग करुन २ आरोपींना ताब्यात घेतलेले आहेत

१) महाजन राम समुच यादव रा. खोपाली तालुका खालापूर जिल्हा रायगड





२) मोहम्मद  हाफिज मोहम्मद जलिल मन्सुरी रा. कुर्ला मुंबई



असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडे मिळुन आलेल्या केबलच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरच्या केबल ह्या शिक्रापुर येथील व्यंकटेश साखर कारखान्यातुन चोरी केली असल्याचे सांगितले सदरबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्र.९४८ / २०२३ भा.द.वि. कलम क्र.४५७,३८० मधील चोरीस गेलेले असल्याचे समजल्याने सदरचे दोन्ही आरोपी, केबल व पिकअप वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे ताब्यात दिले आहेत सदर आरोपीकडुन रक्कम रु.२,५४,००० /- किमतीच्या केबल व पिकअप वाहनासह एकुण रक्कम रु.५,५४,००० /- किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक .अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक.मितेश घट्टे, पोलिस उप अधीक्षक  यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  अविनाश शिळीमकर, पोलिस उप निरीक्षक गणेश जगदाळे, सहा. पोलीस उप निरीक्षक तुषार पंदारे पो हवा जनार्दन शेळके,  राजु मोमीन, योगेश नागरगोजे,  चंद्रकांत जाधव, अतुल डेरे यांनी केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!