अवैधरित्या गुटख्याची विक्री करणारे पानटपरी चालकावर लोणावळा पोलिसांची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखु व गुटख्याची लोणावळा शहरात विक्री करणाऱ्या पानटपरी धारकांवर कारवाईचा बडगा…

लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
सत्यसाई कार्तिक सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असणा-या पान टप-यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला विक्री होत आहे





अशा खात्रीशीर बातमीवरुन सत्यसाई कार्तिक सहा पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा यांनी व त्यांचे अधिनस्त  पोलिस पथकास तसेच लोणावळा शहर पोलिस स्टेशनकडील पोलिस पथकासह लोणावळा शहरातील पानटपरी धारकांवर छापा टाकला असता इसम १) रवि शंकर बुगडे व व. २४ रा. गवळीवाडा, लोणावळा ता. मावळ जि. पुणे (दिलखुश पान शॉप गवळीवाडा) २) अतुल बळीराम लोखंडे व व.४२ रा. गवळीवाडा,किरण पेट्रोलपंपाशेजारी, तुंगार्ली, लोणावळा ता. मावळ जि.पुणे ( रुद्रांश पान शॉप) ३). कृष्णा संदीप गवळी व.व.१९ रा. गवळीवाडा, लोणावळा ता. मावळ जि.पुणे ( कृष्णा पान शॉप) ४) शोयब नईम खान व.व.२५ रा.११२, म्हाडा कॉलनी लोणावळा ता. मावळ जि. पुणे (श्रीराम पान शॉप) ५) मनोजकुमार महावीर प्रसाद भारव्दाज वय ३० वर्षे रा. श्रीकृपा अपार्टमेंट प्लॉट नं. २८ नांगरगावयलोणावळा ता. मावळ जि.पुणे (कुणाल पान शॉप) ६) उमर मोहमद एम. बी. वय ४८ रा. मराठी शाळेजवळ गवळीवाडा लोणावळा ता. मावळ जि.पुणे (इन्टरवल पान शॉप) ७) मोहम्मद एकलास खान व.व.३४ रा.१०२, जी – वार्ड, लोणावळा ता. मावळ जि.पुणे (केजीएन पान शॉप) ८) संजय कान्हु सोनवणे वय ६० वर्षे रा. अदितय सोसायटी फ्लॅट नं. ५३ भांगरवाडी लोणावळा ता. मावळ जि.पुणे (संजय पान शॉप) ९) अशोक गुंडू पुजारी वय ५६ वर्षे रा. व्दारकामाई सोसायटी फ्लॅट नं. ए १ लोणावळा ता.मावळ जि. पुणे (गणेश पान शॉप) १०) शकील अख्तर रईससुद्दीन शेख वय १९ वर्षे रा. रुम नं. १५ हुडको कॉलनी लोणावळा ता. मावळ जि.पुणे (एकविरा पान शॉप) ११) मोहम्मद हसिब शरीफ मन्सुरी वय ३८ रा. विष्णु अजगेकर यांचे घरी भाडयाने, इंदीरानगर लोणावळा ता. मावळ जि.पुणे (श्री स्वामी समर्थ पान शॉप) १२) यासीन मोहम्मद अब्दुल रेहमान वय २७ वर्षे रा. राममंदिर शेजारी गवळीवाडा लोणावळा ता. मावळ जि.पुणे (बिग ५ पान शॉप) १३) अब्दुल रहिमान इब्राहिम वय ३५ रा. पिंगळे यांचे भाडयाचे घरात वलवण लोणावळा ता. मावळ जि.पुणे (रॉयल पान शॉप) १४) वसुद्दीन सिराजउद्दीन खान वय ३६ वर्षे रा. सनाभाभी यांचे खोलीमध्ये भाडयाने नेताजीवाडी खंडाळा ता. मावळ जि.पुणे (वसीम पान शॉप) यांचे कब्जात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळया कंपन्यांचा सुगंधीत तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला असा एकुण १,०८,७७२/- रुपयाचा मुदेदमाल मिळुन आल्याने तो  जप्त करण्यात आला असुन वरील इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख,अपर पोलिस अधिक्षक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी व त्यांचेकडील पोलिस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलिसांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!