
सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा अवैध धंदे विरोधात कार्यवाहीचा धडाका सुरुच,कामशेत येथील जुगारावर केली कार्यवाही…
लोनावळा विभाग, पुणे ग्रामीण चे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासुन अवैध धंद्यांविरोधात बेकायदेशीर कृत्य करणा-या गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत…
लोनावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१०/१२/२०२३ रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनिय माहीती मिळाली की कामशेत पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे बकुसगाव येथील एका पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये काही इसम हे अवैधरित्या जुगार मटका खेळत असल्याची त्यानंतर सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली लोनावळा उपविभाग व कामशेत पोलिस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचुन केलेल्या संयुक्त कारवाईत मौजे कुसगाव ता. मावळ जि. पुणे गावच्या हद्दीत, श्री शशिकांत शिंदे यांचे कार्यालयाचे पाठीमागे असणा-या पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये एकुण सात इसम हे तीनपानी पत्त्याचा जुगार खेळताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन जुगाराच्या डावावरील रोख रक्कम, मोबाईल फोन, वापरलेली वाहने व इतर मुद्देमाल असा एकुण ०६, ३६,८१०/- (अक्षरी सहा लाख छत्तीस हजार आठशे दहा रूपये) एवढ्या किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असुन सदरबाबत कामशेत पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील कामशेत पोलिस स्टेशन चे तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलिस अधिकारी, लोनावळा विभाग, सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शुभम चव्हाण, पो. हवा अंकुश नायकुडे, नापोशि राजु लांडे, पोशि अंकुश पवार,अमोल ननवरे,पवन डोईफोडे यांचे पथकाने केली आहे.




