घरकामासाठी महीला व लहान बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीस लोणावळा पोलिसांनी केले जेरबंद,दोन बालके व एका महीलेची केली सुटका दोन चोरीचे गुन्हेही केले उघड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लोणावळा– लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी  सत्यसाई कार्तिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लोणावळा परीसरातील क्रांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणारे लोकांना मारहाण करून लुटमार करतात तसेच त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांचेकडून घरकाम करून घेतात मिळालेल्या बातमीचा विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने सदरची बाब पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सांगितली. पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व लोणावळा
पोलिसांनी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी  सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली हनुमान टेकडी, क्रांतीनगर
लोणावळा या परीसरातून गोपनीय बातमीचे आधारे

१) राज सिदधेश्वर शिंदे, वय २५ वर्षे, रा. हनुमान टेकडी,
क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे यास





२) ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे वय ४१ वर्षे, रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे



यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता, राज शिंदे याने दि. १७/०९/२०२३ रोजी त्याचे दोन साथीदारांचे मदतीने सहारा ब्रीज जवळ फिरण्यास आलेल्या पर्यटकांना चाकूचा धाक दाखवुन
जबरदस्तीने त्यांचे कपडे, मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती. राज शिंदे याचेजवळ मिळून आलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल हा त्याच घटनेतील असल्याचे त्याने सांगितले. सदर प्रकाराबाबत लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ३८३ / २०२३ भा.दं.वि.का.क. ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच दि
२३/०१/२०२३ रोजी याच टोळीने लोणावळा ब्रीजजवळ डोंगराच्या पायथ्याला पर्यटकांना मारहाण करून लुटले असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत लोणावळा शहर पोस्टे गुरनं २२ / २०२३ भा.दं.वि.का.क. ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
राज शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे यांचेकडे बातमीचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी चालू सप्टेंबर महिन्याचे पहिल्या आठवडयात एका महिलेस लोणावळा स्टेशनचे बाहेरील परीसरातून चाकूचा धाक दाखवून पळवून नेले आणि राहते घरी नेवून कोंडून ठेवले, तिच्या कडील मोबाईल व रोख रक्कम तिला मारहाण करून काढून घेतली व तिचेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची माहिती सांगितली. सदर महिलेस राज शिंदे याचे राहते घरातून सोबत घेवून सुटका करण्यात आली असून तिचा चोरीस केलेला मोबाईल देखील मिळून आला आहे. सदर पिडीत महिलेचे तक्रारीवरुन लोणावळा
शहर पोस्टे गु.र.नं. ४१० / २०२३ भा.दं.वि.का.क. ३७६ (ड), ३७६ (२) (एन), ३९४, ३४४, ३६३, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. पिडीत महिलेची सुटका करतेवेळी त्या ठिकाणी आणखी दोन बालके (अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा) मिळून आल्याने त्यांना विश्वासात घेवून त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करून विचारपूस केली असता, दि ०९/०९/२०२३ रोजी राज शिंदे, त्याची पत्नी करीना ऊर्फ माही राज शिंदे यांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने लोणावळा स्टेशनचे बाहेरील परीसरातून मोटार सायकलवर जबरदस्तीने बसविले व पळवून आणून घरात साखळीने बांधून डांबून ठेवले. तिला उपाशी ठेवून घरातील काम करायला लावून हाताने, सळईने मारहाण केली तसेच तिचेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले असून अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यास डांबून ठेवून त्याचेकडून देखील कामे करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीचे कुटुंबाशी संपर्क करून तिचे आईने लोणावळा शहर पोलिस स्टेशन गु.र.नं. ४०९/२०२३ भा.दं.वि.का.क. ३७६ (ड), ३७६ (२) (एन), ३९४, ३४४, ३६३, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ पोक्सो अॅक्ट कलम ४, ६, ८,१०,१२ सह अल्पवयीन न्याय कायदा कलम ७५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात  आलेला आहे.
एकूण दहा जणांचे टोळीमध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालक, तीन महिला, पाच पुरूष असून त्यांचेपैकी दोन पुरूष आरोपींना अटक करण्यात आलेली असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना येरवडा पुणे येथील बाल निरीक्षण गृह येथे ठेवण्यात आले आहे. इतर सहा आरोपींचा शोध चालू आहे.
सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक अंकीत गोयल , पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक  मितेश घट्टे  पुणे विभाग,  उपविभागीय पोलिस अधिकारी  सत्यसाई कार्तिक ( भा. पो.से.) लोणावळा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोउपनि प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत,सफौ प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोहवा अतुल डेरे, राजू मोमीण, दिपक साबळे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, दता तांबे, पोना संदिप वारे, तुषार भोईटे, बाळासाहेब खडके, पोकॉ मंगेश भगत, अक्षय नवले, प्राण येवले, निलेश सुपेकर, चासफौ काशिनाथ राजापूरे तसेच लोणावळा शहर पोस्टेचे पोनि सिताराम डुबल, सपोनि सुनील पवार, पोउपनि लतिफ मुजावर, पोहवा जयराज पाटणकर, पोना हनुमंत शिंदे, अजिज मिस्त्री, पोकॉ भुषण कुवर, विरसेन गायकवाड, लोणावळा ग्रामीण पोस्टे चे सपोनि कारंडे, पोहवा कवडे, मुंडे, पोना होळकर, खैरे, कदम, पंडीत, तुरे, गवळी, मपोहवा आश्विनी शेंडगे, मपोकॉ रिया राणे यांनी केली असून पिडीत महिला व अल्पवयीन मुलीचे गुन्हयाचा तपास  उपविभागीय पोलिस अधिकारी  सत्यसाई कार्तिक (भा.पो.से.) लोणावळा विभाग हे करत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!