गॅरेज फोडणारा यास लोणावळा पोलिसांनी २ तासात केले गजाआड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पुणे  ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या  त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई
कार्तीक यांनी उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण पथकाची मिटींग घेवुन घरफोडी चोरी उघडकीस आणणेबाबत सुचना व आदेश दिले त्यानुसार दिनांक १७/११/२०२३ रोजी रात्री १०:०० वा.ते दिनांक १८/११/२०२३ रोजी
सकाळी ०७:३० वा चे दरम्यान लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन पोलिस स्टेशन हददीमध्ये मौजे भाजे ता मावळ जि पुणे येथील ओमसाई नावाचे गॅरेज मधुन मोटार सायकलचे ब्लॉक पिस्टन, लायनर, चैन किट, फोर व्हिलरचे क्लच प्लेट, ब्रेक डिक्स असा एकुण १६,०५०/- रूपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी चोरी करून चोरून नेलेबाबत दि. २३/११/२०२३ रोजी लोणावळा ग्रामीण पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता
त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनकडील पोलिस निरीक्षक  किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि भारत भोसले, पोहवा नितीन कदम, पोशि केतन तळपे, राहुल खैरे, निखील पंडीत, होमगार्ड अमित भदोरिया या पथकाने मौजे भाजे, मळवली, कार्ला या भागात गस्त घालुन तसेच बातमीदारामार्फत माहिती घेवुन संशयीत इसम संदीप भानुदास जाधव, वय ४१, रा. लोणावळा रेल्वे स्टेशनजवळ लोणावळा ता मावळ जि पुणे मुळ रा.
टाकळकरवाडी ता खेड जि पुणे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास गुन्हयाचेकामी अटक करण्यात आले आहे. त्याची मा.न्यायालयाने
कोर्टाने ०३ दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली असुन कस्टडी दरम्यान गुन्हयामध्ये गेलेला १६,०५०/- रू. किं.चा मुददेमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास
पोहवा नितीन कदम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीणअंकीत गोयल,  अपर पोलिस अधीक्षक मितेश घटटे पुणे विभाग,सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोउपनि भारत भोसले, पोहवा नितीन कदम, पोशि केतन तळपे, राहुल खैरे, निखील पंडीत, होमगार्ड
अमित भदोरिया यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!