सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी नशामुक्ती संबंधी आयोजित कार्यशाळेत केले मार्गदर्शन….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत सिंहगड ईन्स्टीट्युट,लोणावळा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते…..





लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदशनाखाली लोणावळा विभागाचे सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन पुणे ग्रामीण पोलिस
दलाकडुन राबविण्यात येत असलेल्या संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत दि.(१६) रोजी सिंहगड इंस्टिटयुट, कुसगाव बु लोणावळा ता. मावळ जि. पुणे या संस्थेत नशामुक्ती संबंधीत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती



याठिकाणी एकुण ८ विविध विभागाचे कॉलेजमधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कोऑर्डीनेटर, एनएसएस, एनसीसी व इतर सर्व विध्यार्थी यांचेसाठी संकल्प नशामुक्ती अभियानाचे माध्यमातुन सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक, लोणावळा विभाग, लोणावळा यांनी कार्यशाळा घेऊन सहभागी सर्व विध्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. तसेच कॉलेजमधील विध्यार्थामध्ये वाढत चाललेले नशेच्या सेवनाबाबत विध्यार्थी व कॉलेज प्रशासनाला योग्य त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
१) कॉलेजमधील जे विध्यार्थी दारू, गांजा, चरस, एमडी पावडर अशा विविध प्रकारचे नशेच्या आहारी गेलेले आहेत त्यांची माहिती संकलीत करणे
२) कॉलेजमध्ये अशा प्रकारची कोणी नशा करत असल्यास अथवा अशी आमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती असल्यास त्याबाबत आम्हाला वैयक्तिक माहिती कळविण्याबाबत आवाहन केलेले आहे.
३) कॉलेजमध्ये समुपदेशन कक्ष (काऊसिंलीग सेल) स्थापन करून त्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य,शिक्षक, हॉस्टेलचे रेक्टर, पोलिस असे प्रतिनिधी यांची नेमणुक करणे
४) नशा करणारे विध्यार्थी यांना संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अशा समुपदेशन कक्षामध्ये त्यांचे त्याठिकाणी समुपदेशन (काऊसिलींग) करणे, नशा करणारे विध्यार्थी यांचे पालकांना बोलावुन त्यांचे करवी मार्गदर्शन करणे
५) कॉलेजचे मुख्य प्रवेशव्दार, हॉस्टेलचे प्रवेश व्दार व एक्झीट गेटवर तपासणी करणे
६) कॉलेज प्रशासनाचे माध्यमातुन विध्यार्थी वास्तव्याचे ठिकाणी अचानकपणे भेटी देऊन अशा दारू,गांजा, चरस, एमडी इत्यादी प्रकारची नशा कोण करते आहे का याची तपासनी करावी
७) कॉलेज लगत असलेली पोलिस चौकी सक्रीय करून त्याठिकाणचे पोलिस स्टाफच्या मदतीने कॉलेज कॅम्पस व हॉस्टेल परीसरात पेट्रोलींग करण्यात येईल. कॉलेजमधील विध्यार्थी यांचेवर कॉलेज प्रशासन व पोलिस प्रशासनाचे मार्फतीने विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
८) कॉलेजमधील विध्यार्थी यांना नशा पुरवणारे डिलर यांची माहिती संकलीत करून त्यांचेवर प्रभावी कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
वरीलप्रमाणे विविध विषयांवर मार्गदर्शन करून कॉलेजमधील तरूण मुले-मुलांमध्ये वाढत चाललेली विविध प्रकारची नशा रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस दलाने संकल्प नशा मुक्ती अभियान सुरू केलेले आहे. आतापर्यन्त या अभियानामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!