लोणावळा मॅगी पॅाईंट येथील अवैधरित्या वसलेल्या टपरी धारकांना पोलिसांनी दिला मोलाचा सल्ला…
लोणावळा(पुणे ग्रामीण ) सवीस्तर व्रुत्त असे की लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मॅगी पॉईंट येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालु ठेवणा-या ५ टपरी धारकांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांचे वर खटले दाखल करण्यात आले आहेत. यापुर्वी वारंवार सुचना देऊन व कारवाई करुन ही मॅगी पॉईंट येथील टपरी धारक आपली टपरी रात्रभर चालु ठेवुन तेथे मुंबई पुण्याहुन येणा-या पर्यटकांना मॅगी व इतर खाद्य पदार्थांची विक्री करत असतात त्यामुळे सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावर सहा. पोलुस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वता लक्ष घालुन शर्ती पेक्षा जास्त वेळ टपरी चालु ठेवुन खाद्य पदार्थ विक्री करणा-या टपरी धारकांवर कारवाई करुन त्यांचेवर खटले दाखल करण्यात येवुन परिणाम कारक कारवाई केली आहे. तसेच या पुढेही लोणावळा विभागात रात्री उशीरा पर्यन्त आस्थापणातुन खाद्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे मिळुन आल्यास त्यांचेवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई सहा. पोलिस अधिक्षक, सत्यसाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलिस निरीक्षक राहुल लाड लोणावळा शहर पोलीस स्टेशन पोशि विकास कदम, होमगार्ड तिखे, होमगार्ड ठाकर यांनी केली आहे.