खोपोलीत एमडी बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा; १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

खोपोलीत एमडी बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा; १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त 

रायगड – इलेक्ट्रिक पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मिती करण्याचा कारखाना तीन जणांनी सुरू केला होता. यातून एमडी पावडरची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी यंत्रणांची नजर चुकवत मेफेड्रोन तयार केले जात होते. मात्र रायगड पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी कंपनीवर धाड टाकली आणि १०७ कोटींची एमडी पावडर जप्त केली.







खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावच्या हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावुन आतमध्ये अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याबाबत खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली. सदर गोपनीय माहीती ही वरीष्ठांना कळवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाईच्या अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना प्राप्त करुन उपविभागीय पोलिस अधिकारी, खालापुर विक्रम कदम व खोपोली पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत व खोपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी वरील नमुद कंपनीमध्ये कायदेशीर पद्धतीने छापा घातला.



या बाबत अधिक माहिती अशी की, दि.०७ डिसेंबर रोजी पोलिस पथकाने सदर ठिकाणी कंपनीत प्रवेश केल्यानंतर कंपनीचे चालक यांच्याकडे सदर ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारा शासनाचा कोणताही वैध परवाना मिळुन आला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत असल्याचे व काही कच्चा माल, तसेच त्याचेवर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असेंबल केल्याचे दिसुन आले. यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ आढळून आल्याने अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली. याबाबत तयार पक्का माल असलेली पावडर ही नार्को इन्स्पेक्शन कीट (Narco Inspection kit) द्वारे तपासणी केली असता सदर तयार केलेला माल हा एम.डी. म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) असल्याचे निष्पन्न झाले.

१. जप्त केलेला तयार मुद्देमाल – १०६ कोटी ५० लाख रु. किंमतीची एकुण ८५ किलो २०० ग्रॅम वजनाची एम.डी. पावडर

२. जप्त केलेला कच्चा मुद्देमाल – १५,३७,३७७/- रु. किमतीची एम.डी. पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने

३. जप्त केलेला इतर मुद्देमाल – ६५,००,०००/- रु. किंमतीची रासायनिक प्रक्रीयेसाठी असेंबल केलेली साधन सामग्री

अशा प्रकारे वरील सर्व मुद्देमालाची एकुण किंमत १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये (अक्षरी रुपये एकशे सात कोटी तीस लाख सदोतीस हजार तीनशे सत्याहत्तर मात्र) असुन सदर मुद्देमाल व मालमत्ता जप्त करुन सील करण्यात आलेला आहे. वरील प्रमाणे केलेल्या कारवाईमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन सदर बेकायदेशीर कंपनी देखील सील करण्यात आली आहे.

सदर कारवाई हि प्रविण पवार, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परीक्षेत्र, सोमनाथ घार्गे, पोलिस अधिक्षक, रायगड, अतुल झेंडे, अपर पोलिस अधिक्षक, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, खालापुर यांच्या नेतृत्वाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत, सहा. पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, प्रविण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, पोहवा  राजेंद्र पाटील, सागर शेवते, प्रसाद पाटील, मपोहवा  आर.एन. गायकवाड, पोना  सतीष बांगर, कुंभार, आर.डी. चौगुले,  राम मासाळ, पोशि  प्रदीप खरात यांनी केली आहे.

अशा प्रकारे पोलिस पथकाने सतत २४ तास मेहनत करुन सदर कारवाई पुर्ण केली आहे. याबाबत खोपोली पोलिस ठाणे गुन्हा रजि. क्र. ३६४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(c), २२ (c) सह कलम २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत हे करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!