
बांधकामावरील साहीत्य चोरणारे रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…
अलिबाग(रायगड)- अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत कुरूळ येथून बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून बांधकामचे सेंटरिंग करीता लागणारे 63 लोखंडी प्लेट चोरीस गेले बाबत प्राप्त तक्रारीवरून अलिबाग पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.183/2023 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे दिनांक 17/07/ 2023 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के व त्यांचे पथक करीत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण
शाखेकडील पथकातील पोलिस पोशि ईश्वर लांबोटे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे तसेच सिडिआर महितीतचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित इसम
1. मिराज मोहन औचटकर,वय-23 वर्ष रा.महाजने मल्याण, ता.अलिबाग,


2. विराज गोरख धसाडे, वय-23 वर्ष, रा.धसाडे कुणे,पोस्ट उसर, ता.अलिबाग यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता
त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्ह्यातील चोरी केलेले 31,500/- रुपये किंमतीचे 63 लोखंडी सेंटरिंग प्लेट चोरी गेलेला 100% मुद्देमाल आरोपी यांचे कडून हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीत याचेवर पूर्वीचे दाखल गुन्हे /-
1. मिराज मोहन औचटकर, वय-23 वर्ष, याच्यावर वडखळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 142/2021 भा.द.वि.कलम 379, 34 प्रमाणे (मोटरसायकल चोरीचा) गुन्हा दाखल असून कोर्ट
प्रलंबित आहे
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक रायगड-अलिबाग, अतुल झेंडे,अपर पोलिस अधीक्षक रायगड अलिबाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांचे अधिपत्याखालील पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के,पोशि ईश्वर लांबोटे, ओमकार सोंडकर, विशाल आवळे व सायबर सेल शाखेचे तुषार घरत, पोना अक्षय पाटील यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल
शिर्के हे करीत आहेत.

I



