
रोहा येथील खुनाचा २४ तासात केला उलगडा….
रायगड : दिनांक 04.10.2023 रोजी दुपारी मयत महिला लक्ष्मी रामा वाघमारे वय 60 वर्षे रा. धामणीसई आदिवासीवाडी ता.रोहा या ठिकाणी राहत असलेल्या घराजवळ त्यांचे वडिलोपार्जित शेतीमध्ये डोके जमिनीवरती खड्डा पडे पर्यंत कोणीतरी अज्ञात इसमाने आपटून ठेचून जीवे ठार मारले आहे याबाबत रोहा पोलिस ठाणे येथे गु.रजि.नं.154/2023 भा.दं.वि.क.302 प्रमाणे दिनांक 04/10/2023 रोजी 23:49 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती कळताच सदर ठिकाणी अपर पोलिस अधीक्षक .अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रोहा विभाग श्रीमती सोनाली कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर, रोहा पोलिस ठाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक . प्रमोद बाबर यांना करण्याचे आदेश दिले. तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास
करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा
पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस उप निरीक्षक विकास चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहवा यशवंत झेमसे, रुपेश निगडे, जितेंद्र चव्हाण, विशाल आवळे, पोशीअक्षय सावंत, भारत तांदळे,लालासाहेब वाघमोडे, बाबासो पिंगळे, ओमकार सोंडकर,सचिन वावेकर असे पथक तयार करून रोहा येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेवरील पथकाने तपास करून गोपनीय माहितीदाराकडून माहिती घेवून संशईत इसम नामे शांताराम पांडुरंग जाधव वय 24 वर्षे यास गुन्ह्याचे कामी ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली देवून ती मयत महिला हिचा नातू असून लक्ष्मी रामा वाघमारे वय 60 वर्षे हिने त्यास दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरून त्यांचे मयताचे घराजवळील शेतीमध्ये डोके जमिनीवरती खड्डा पडे पर्यंत आपटून चेचून जीवे ठार मारल्याचे सांगत आहे त्यास स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांच्या टीमने गुन्ह्याचे कमी
ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता रोह पोलिस ठाणे येथे गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यास मा. न्यायालयाने दिनांक
12/10/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास पोनि प्रमोद बाबर हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक नागेश कदम पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार पोहवा यशवंत झेमसे ,रुपेश निगडे, जितेंद्र चव्हाण, पोना विशाल आवळे, पोशी अक्षय सावंत, पोशी भारत तांदळे, लालासाहेब वाघमोडे, बाबासो पिंगळे, ओमकार सोंडकर, सचिन
वावेकर यांनी गून्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


