दुसरे लग्न का केले असा तगादा लावणार्या पत्नीची केली हत्या…
पाली(रायगड)- सवीस्तर वु्त्त असे की दिनांक 09/09/2023 रोजी 17.30 वा.च्या सुमारास मौजे उंबरवाडी कातकरीवाडी गावचे हददीतील आदीवासी ग्रामस्थाकडून उंबरवाडी जवळील डोंगरावरील जंगलभागात एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत कुजलेल्या व सडलेल्या स्थितीत पडून असले बाबत नवघर गावचे पोलिस पाटील यांनी पाली पोलिस ठाण्यात फोनव्दारे संपर्क
करून कळविले. त्यावरून तात्काळ पाली पोलिस ठाणेच्या प्रभारी अधिकारी मपोनि/श्रीम. सरिता चव्हाण, व इतर अधिकारी/स्टाफ घटनास्थळी जावून तपास केला. सदरचा मृतदेह हा 5 ते 6 दिवसापूर्वीचा वाटत होता. त्यामुळे पाली पोलिस ठाण्यात त्या कालावधीत दाखल असलेले मिसींग क्र.13/2023 मधील मिसिंग महिला नामे कुसबा सागर पवार, वय-24 वर्षे रा.आरडयाचीवाडी, ता. सुधागड हिचे पती सागर किसन पवार यास सदर मयत महिलेचे मृतदेह दाखवून मयत महिलेचे कपडे दाखविले असता त्याने ओळखले नाही. त्यानंतर अधिक तपास करून मिसींग महिला
कुसबा सागर पवार हिच्या राहत्या घरी जावून तिचा मुलगा वय-6 वर्षे, यांस विश्वासात घेवून मयत महिलेच्या मृतदेहाच्या अंगावरील कपडे दाखविले असता त्याने ते पाहून ते कपडे त्याच्या मम्मीचे असल्याचे सांगितले. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर किसन पवार याचा संशय आल्याने त्याचे विरुद्ध तांत्रिक दृष्ट्या तपास केला. सागर पवार याने सदर मयत महिला ही त्याची पत्नी कुसबा सागर पवार असून सुद्धा जाणुनबूजून ओळखले
नाही. या सर्व कारणांवरून सागर पवार हा काहीतरी लपवत असल्याचे निदर्शनास आले त्याचेकडे सखोल तपास
केला असता त्याने त्याची पत्नी नामे कुसबा सागर पवार हीचे बहिणीला सागर याचे कडून घेतलेले पैसे परत दिले नाही.
तसेच सागर पवार याने दुसरे लग्न केले या कारणावरून त्यास त्याची पत्नी मानसिक त्रास देत असल्याने तिचा दि.05/09/2023 रोजी दुपारी 1.00 वाजता ते 03.00 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून तिला मोटार सायकलवर बसवून नवघर गावापर्यंत घेवून गेला व तेथून पायी चालत तिस उंबरवाडी कातकरीवाडी जवळील डोंगरावरील जंगलभागात भुत्याची मळशी या ठिकाणी फिरायला घेवून गेला व तेथेच झालेल्या भांडणाच्या रागातून तिचा हाताने
गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. म्हणून सदर आरोपी विरूध्द पाली पोलिस ठाणे गु.रजि. नं.130/2023
भा.द.वि.सं.कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्हयात सागर किसन पवार वय-28 वर्षे, रा. आरडयाचीवाडी, ता. सुधागड अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास मपोनि/सरिता चव्हाण ह्या करीत आहेत.
सदर गुन्ह्याबाबत सोमनाथ घार्गे,पोलिस अधीक्षक रायगड, अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक
रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती सोनाली कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, रोहा विभाग रोहा यांच्या
सुचनांप्रमाणे गुन्हयाचे तपासात पोउपनि म्हात्रे, वसंत जिवडे, सचिन निकम, दिनेश घाडगे, सफौ निलेश महाडीक, मपोह सरिता परदेशी, पोहवा युवराज म्हात्रे, पोह/867 चाळके,
पोना/2293 तुषार घरत, पोना धर्मेंद्र म्हात्रे, कांचन भोईर, सचिन पालकर, पोशी 569 विकास राठोड, नामदेव आलदर, गोंधळी, होमगार्ड ठोंबरे, पोलिस पाटील नवघर किशोर दळवी, यांनी केली