चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटणारे २४ तासात जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटणारे २४ तासात जेरबंद

छत्रपती संभाजी नगर – फिर्यादी हे मोटारसायकलवर छत्रपती संभाजीनगर येथे जात असतांना आडूळ बायपास येथे अनोळखी चार इसमांनी  फिर्यादीची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. अशी तक्रार फिर्यादी शेख यांनी दिल्या नंतर २४ तासांच्या आतच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.





पोलिस ठाणे पाचोड येथे फिर्यादी नामे शेख रफिक शेख बाबूलाल (वय ३२ वर्षे) रा.अंबड जि.जालना यांनी दि.०२डिसेंबर रोजी पो.स्टे ला तक्रार दिली की, ते दि.०२डिसेंबर रोजी दूपारी ११:१५ वा. त्यांच्या मो.सायकलवर संभाजीनगर येथे जात असतांना आडूळ बायपास येथे अनोळखी चार इसमांनी फिर्यादीची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील ४३००/- रुपये बळजबरीने हिसकावून घेवून गेले बाबत दिलेल्या तक्रारी वरुन गु.र.क्र ४४७/२०२३ कलम ३९२ भा.द.वि प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



या बाबत अधिक माहिती अशी की, मनिष कलवानीया पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सतिश वाघ, पोलिस निरीक्षक स्था.गु.शा यांनी दरोडा जबरी चोरी पथकासह घटनास्थळाची पाहणी करून सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असताना पोलिस निरीक्षक स्थागुशा सतिश वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सुदर्शन पांढरे रा.आडूळ याने त्याच्या इतर साथीदारासह केला असून तो जकात नाका हर्सल परिसरात लपुन बसला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.



नमूद माहितीच्या ठिकाणी स्था.गु.शा च्या पथकाने सापळा लावुन आरोपी नामे १) सुदर्शन नंदू पांढरे( वय २८ वर्षे) रा.आडूळ ता.पैठण यास शिताफिने ताब्यात घेवून त्यास गुन्हयासंदर्भात विचारपूस करता सदरचा गुन्हा हा त्याने त्याच्या इतर साथीदारासह केल्याची कबुली दिली. यावरून आरोपी नामे १) सुदर्शन नंदू पांढरे वय २८ वर्षे रा. आडूळ ता.पैठण २) सागर भाऊसाहेब वाघ (वय २८ वर्षे), रा.आडूळ यांना नमुद गुन्हयात अटक करून पुढील कारवाई करिता पो.स्टे पाचोड येथे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पाचोड पोलीस करत आहे.

अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया,अपर पोलिस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ, पोउपनि. भगतसिंग दुलत, पोलिस अंमलदार नामदेव सिरसाठ, दिपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!