सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक…

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पुर्व वैमनस्यातुन गोळ्या झाडून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकाजवळ बुधवारी (दि.२९) रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिपक दत्तात्रय कदम (रा.आशिर्वाद बिल्डींग शेजारी, जयमाला नगर लेन नं.२, जुनी सांगवी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर अमन राजेंद्र गिल (वय १८ वर्षे, रा.नवी सांगवी, पुणे), सुजल राजेंद्र गिल (वय १९ रा. नवी सांगवी, पुणे) व सौरभ गोकुळ घुटे (वय २२, रा. जुनी सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. २३८/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२, ३४, आर्म ॲक्ट कलम ३(२५) (२७), महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.





(दि.२९मे) रोजी रात्री ०९/४५ वा.चे. सुमारास न्यु. सिध्देश्वर फॅमिली पान शॉप समोर, इंद्रप्रस्थ सोसायटी, माहेश्वरी चौक, नवी सांगवी, पुणे येथे अमन गिल व त्याचे इतर साथीदारांनी मोटार सायकलवरुन येऊन त्यांचेकडील बंदुकीतून इसम नामे दिपक दत्तात्रय कदम, रा.आशिर्वाद बिल्डींगचे शेजारी, जयमाला नगर लेन नं.०२, जुनी सांगवी, पुणे याचेवर गोळया झाडुन त्याचा खुन केला. सदर घटनेबाबत सांगवी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. २३८/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२, ३४, आर्म ॲक्ट कलम ३(२५) (२७), महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस घेत होते. पोलीसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी नामे अमन राजेंद्र गिल, (वय १८ वर्षे), रा.नवी सांगवी, पुणे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे तपास केला असता त्याचा दाखल गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास (दि.३०मे) रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपी नामे अमन राजेंद्र गिल याचेकडे सखोल तपास करुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे १) सुजल राजेंद्र गिल, (वय १९ वर्षे), रा.नवी सांगवी, पुणे, २) सौरभ गोकुळ घुटे, (वय २२ वर्षे), रा.जुनी सांगवी, पुणे यांना औध परिसरातुन ताब्यात घेतले आहे. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने (दि.३१मे) रोजी त्यांना गुन्ह्यात अटक केली. सुमारे २० दिवसापुर्वी मृतक दिपक कदम याने आरोपी सुजल गील व अमन गील यास धमकावलेले होते. त्या पुर्व वैमनस्यातुन व सुडाच्या भावनेतुन आरोपींनी दिपक कदम याचा खुन केल्याचे तपासादरम्यान कबुल केले आहे. सदर आरोपीकडे सखोल तपास करुन दाखल गुन्ह्यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. याबाबत पोलिस तपास करत आहे. कोर्टाने आरोपी नामे अमन राजेंद्र गिल (दि.०४जुन) रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेला आहे. तसेच इतर दोन आरोपीस उद्या कोर्टात रिमांड कामी हजर केले जाणार आहे.



 सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त(गुन्हे), संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा(अतिरिक्त कार्यभार परी.२) विशाल गायकवाड, सहा पोलिस आयुक्त,पिंपरी विभाग सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे वपोनि. महेश बनसोडे, सहा.पोलिस निरीक्षक तानाजी भोगम, पोउनि चक्रधर ताकभाते, किरण कणसे, पो.हवा प्रकाश शिंदे, विवेक गायकवाड, विजय मोरे, प्रमोद गोडे, विनोद साळवे, राजेंद्र शिरसाट, नितीन काळे, विनायक डोळस, नापोशि प्रविण पाटील, पोशि आकाश खंडागळे, विजय पाटील, निलेश शिंगोटे, राजाराम माने, सुहास डंगारे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!