अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे कारावासाची शिक्षा…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे कारावासाची शिक्षा…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरात घेवुन तिचे मनाविरुध्द तिच्यावर जबरदस्ती करुन तु कोणाला सांगितले तर तुझी बदनामी होईल माझे काय मी जेलमधुन सुटुन येईल असे म्हणून मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास विशेष न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.एल. गांधी, वडगाव मावळ, पुणे यांनी या प्रकरणी आरोपीला भादवि कलम ३७६ (१), ५०४, सह बाललैंगीक अत्याचार कायदा कलम ४.८.१२ प्रमाणे दोषी धरुन २० वर्षे कारावासाची शिक्षा व १०,०००/- रुपये दंड आणि दंड न भरल्यास ०६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१०मे२०१७) रोजी १२/३० वा.ते १९/०० वा.चे सुमारास आंबेडकरनगर, देहुरोड, ता.हवेली, जि.पुणे येथे आरोपी नामे योगेश दत्तात्रय हेमाडे (वय २० वर्षे), रा.सदर यांने फिर्यादीस जबरदस्तीने घरात घेवुन तिचे मनाविरुध्द तिच्यावर लैंगीक अत्याचार करुन तु कोणाला सांगीतले तर तुझी बदनामी होईल माझे काय मी जेलमधुन सुटुन येईल अशी धमकी दिली म्हणुन सदरबाबत देहुरोड पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं.१८८/२०१७ भादंविक ३७६ (१). ५०४, बाल लैंगीक अत्याचार कायदा कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तद्नंतर सदर गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीमती बोरकर यांनी आरोपी नामे योगेश गुलाब हेमांडे (वय २० वर्षे), रा.गांधीनगर, देहुरोड, पुणे यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेविरुध्द सबळ पुरावा गोळा करुन न्यायालयात विहीत मुदतीत दोषारोपपत्र सादर केले होते.
सदर खटला हा सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता स्मिता मुकुंद चौगुले यांनी चालविला त्यांनी गुन्हा न्यायालयात योग्य पुरावे सादर करुन खटला साबीत करण्यासाठी प्रभावीपणे युक्तीवाद केला त्याकरीता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करुन सरकार तर्फे पिडीतेसाठी भक्कमपणे बाजु मांडली असता विशेष न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.एल. गांधी, वडगाव मावळ, पुणे यांनी त्यांचा युक्तीवाद ग्राहय धरला व आरोपी नामे योगेश गुलाब हेमांडे यास भादवि कलम ३७६ (१), ५०४, सह बाललैंगीक अत्याचार कायदा कलम ४.८.१२ प्रमाणे दोषी धरुन २० वर्षे कारावासाची शिक्षा व १०,०००/- रुपये दंड आणि दंड न भरल्यास ०६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सदरची कामगिरी ही विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अप्पर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, बापु बांगर, पोलिस उप-आयुक्त परि.२ अरविंद घेवारे, सहा पोलिस आयुक्त देहुरोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि विजय वाघमारे, म.पोलिस उपनिरीक्षक श्रीमती बोरकर, कोर्ट पैरवी अधिकारी, श्रेणी. पोलिस उपनिरीक्षक तनपुरे, कोर्ट अंमलदार, पोलिस हवालदार बाळु तोंडे यांनी या खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालयामध्ये पाठपुरावा केला होता.