पाच वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देणारा मोक्का या गुन्ह्यातील अट्टल आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सोलापुर – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी मौजे वीट, ता. करमाळा गावातील फिर्यादीचे घरात अज्ञात सहा दरोडेखोर घुसून तलवार, कुऱ्हाड व लोखंडी गजाने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून जखमी करून घरातील २,४८,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम घेवून गेले होते. त्याबाबत करमाळा पोलिस ठाणे गु.र.नं. ७३८/२०१८,
भा.द.वि.क.३९५,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास . वाघमारे, तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक, करमाळा पोलिस ठाणे यांनी केला होता. त्यामध्ये त्यांनी आरोपीचा शोध घेवून अटक केले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हयातील
आरोपींनी संघटीतरीत्या एकत्रीत येवून स्वतःच्या आर्थीक फायद्याकरीता व टोळीचे वर्चस्व राहवे याकरीता दहशत  निर्माण करून मालमत्ता हस्तगत असल्याचे दिसून आल्याने सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनिमय १९९९ (मोका कायदा) ची कलमे अंतर्भूत करण्यात आली होते.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून त्यातील आरोपी शिवा रंजन काळे हा राहते ठिकाण बदलून परागंधा झाला होता. सदर आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण कडील पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सुबोध जमदाडे, पोलिस उपनिरीक्षक यांचे पथक घेत होते. सदर पथकास गुन्हयातील आरोपी





शिवा उर्फ बापू रंजन उर्फ शिवा काळे, रा. कर्जत, जि. अहमदनगर



हा स्वतः चे अस्तित्व लपवून, नाव बदलून  वावरत असल्याची माहिती मिळाली होती. दिनांक ३०.१०.२०२३ रोजी पोउपनि जमदाडे यांच्या पथकाला करमाळा येथील केतूर नाका परीसरात येणार असल्याची गोपनिय बातमीदारामार्फत माहिती समजली होती. त्यावरून पथकाने सापळा लावून शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक तपास करून त्याचे खऱ्या नावाची माहिती घेवून
पुढील तपासकामी उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सुबोध जमदाडे पोलिस उपनिरीक्षक, यांचेसह सहा.फौ. शिवाजी घोळवे, पोह प्रकाश
कारटकर, पोहवा रवी माने, मपोह मोहीने भोगे, पोकॉ अजय वाघमारे, सुरज रामगुडे, प्रमोद माने यांनी पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!