
दरोड्याच्या गु्न्ह्यात १० वर्षापासुन फरार असलेला आरोपी लागला पोलिसांच्या गळाला…
सोलापुर(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २ ऑक्टोबर २०१३ रोजी करंकब पोलिस ठाणेच्या हद्दीतील मौजे बादलकोट गावातील कदम वस्ती येथे राहणारे अंकुश कदम हे आपल्या कुटूंबासह वस्तीवरील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकू व तलवारचा धाक दाखवून घरातील २,६८,८००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम जबरी चोरी करून घेवून गेले होते. त्याबाबत करंकब पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ७१/२०१३ भा.द.वि.क. ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास राजेंद्र टाकणे, तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक, करकंब पोलिस ठाणे यांनी केला होता. त्यांनी सदर गुन्हयात एकूण १० आरोपी निष्पन्न करून त्यातील ९ आरोपींना अटक करून त्यांच्याविरूध्द दोषारोप पत्र दाखल केले होते. परंतू सदर गुन्हयात
बिभीषण शरद काळे, वय ३७, रा. फुलचिंचोली, ता. पंढरपूर


हा गुन्हा घडल्यापासून स्वत:चे अस्तित्व लपवून राहत होता. सदर आरोपीस अटक करणेबाबत सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेल्या मार्गदर्शनावरून पोउपनि सुबोध जमदाडे व त्यांच्या पथकाने सदर आरोपी हा कोथाळे ते इचगाव या रस्त्यावरून मोटार सायकलवरून जाणार असल्याची गोपनिय माहिती काढली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने पोउपनि जमदाडे यांच्या पथकाने सापळा लावला होता. बातमीनुसार आरोपी हा मोटार सायकलवरून आला असता त्यास ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी करकंब पोलिस ठाणेस
हजर केले आहे.सदरचा आरोपी हा मालाविषयी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याचेविरूध्द खाली नमुद पोलिस ठाणे येथे खालिल प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे
पंढरपूर शहर पोलीस ठाणे
करकंब पोलीस ठाणे
कलम भा.द.वि.क. ३९४,३४
भा.द.वि.क.३७९,३४
भा.द.वि.क. ३९५
सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्था. गु. शा. सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि सुबोध जमदाडे, श्रेणी पोउपनि बिराजी पारेकर, सहा.फौ. शिवाजी घोळवे, पोहवा प्रकाश कारटकर, पोना रवि माने, पोकॉ अजय वाघमारे, अन्वर आत्तार, सुरज रामगुडे, प्रमोद माने यांनी पार पाडली आहे.



