अंमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतुक करणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,६२ किलो गांजा केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

६२ किलो गांजासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची केली अटक…

सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक, तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असल्याने या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग आहेत. या मार्गावरून देशाच्या पूर्व व दक्षिण भागातील राज्यातून प्रतिबंधीत अंमली पदार्थ  गांजाची छुप्या पध्दतीने वाहतूक होत असल्याबाबत पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांना माहिती प्राप्त झाली त्यावरून पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून प्रतिबंधीत अंमली पदार्थ गांजासह  कारवाई करण्यास आदेशीत केले होते.





त्याअनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरज निबांळकर यांचे पथक या मार्गावर होणारे गांज्याच्या वाहतूकीवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार दि.१६.०९.२०२४ रोजी पोहवा विजय कुमार भरले यांना वैराग पोलिस ठाणेच्या हद्दीतून तुळजापूर ते बार्शी रोडने इनोव्हा कारमधून गांजा वाहतूक होत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सपोनि विजय शिंदे व पोउपनि सुरज निंबाळकर यांनी पथकासह आवश्यक ती सर्व कार्यवाही करुन दि. १६.०९.२०२४ रोजी हे पथकाने  मौजे गौडगाव गावचे शिवारात सापळा लावून थांबले असतांना संध्या ६.३० वा.च्या सुमारास तुळजापूरकडून गौडगावकडे बातमीतील नमूद वर्णनाची इनोव्हा येत असल्याचे दिसून आले. त्यांवरून पथकाने सदरची इनोव्हा कार आडवली. त्यामध्ये एकूण ४ इसम मिळून आले तसेच इनोव्हाच्या कारच्या मागील सीटवर दोन पांढरे रंगाचे पोत्यामध्ये ६२ किलो १३५ ग्रॅम गांजा, ६ मोबाईल, इनोव्हा कार असा एकूण ३०,०४,७००/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आला



सदरचा मुद्देमाल हा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला असुन. सदरबाबत वैराग पोलिस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमचे कलम ८(क) व २० (ब), ii (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोउपनि सुरज निबांळकर, स्था.गु.शा हे करीत असून आरोपींची दि. २१.०९.२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.



सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक. प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा सुरेश निंबाळकर, सपोनि विजय शिंदे, पोउपनि सुरज निंबाळकर, श्रेणी पोउपनि राजेश गायकावाड, श्रीकांत गायकवाड, सहा. फौजदार निलकंठ जाधवर, पोहवा विजयकुमार भरले, सलीम बागवान, हरिदास पांढरे, जयवंत सादुल, युसुफ पठाण, नापोशि धनराज गायकवाड, व्यंकटेश मोरे, पोशि समर्थ गाजरे, यश देवकते, विनायक घोरपडे, सुरज रामगुडे, मनोज राठोड, चापोकॉ राजेंद्र गवेकर, अशोक हलसंगी, सतीश बुरकुल यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!