
जन्मदात्या बापाचा मुलानेच काढला काटा,१२ तासाचे आत केला खुनाचा उलगडा…
नातेपुते(सोलापुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 15/11/2023 रोजी सकाळी 07:45 वा. चे पूर्वी अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून, तिक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर जबर मारहाण करून जिवे ठार मारून त्यांची मोटार सायकल शिंगणापूर नातेपुते जाणा-या रोडवर भवानी घाट, पिंपरी येथे, घाटाचे तिसरे वळण संपल्यानंतर रोडच्या खाली पाच फूट अंतरावर टाकून खून केला अशी माहिती मिळाली होती.
सदर खूनाच्या गुन्हयाचे गांभीर्य ओळखून शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी तात्काळ गुन्हयाचे ठिकाणी भेट देण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले, पंढरपूर उपविभाग, अतिरिक्त चार्ज अकलुज उपविभाग, तसेच सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व त्यांचे पथकास योग्य त्या मार्गदर्शनपर सूचना दिल्या. त्यानुसार सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व सपोनि नागनाथ खूणे व त्यांचे पथक असे घटनास्टळी भेट देवून माहिती घेतली. दरम्यान सदर गुन्हयातील अनोळखी व्यक्ती ही मौजे कोंडबावी ता. माळशिरस जि. सोलापूर या गांवातील असल्याची माहिती मिळाली. मयताचा मुलगा सुरज सावंत याने प्रेत ओळखून माझे वडिल पांडूरंग चंद्रकांत सावंत याचेच प्रेत असल्याचे सांगितले. तेंव्हा मयताचा मुलगा सुरज पांडूरंग सावंत, वय 24 वर्षे, रा. कोंडबावी ता. माळशिरस यांनी अज्ञात व्यक्ती विरूध्द फिर्याद दिल्याने नातेपुते पोलिस ठाणे गुरनं 369/2023 भादविसंक 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील मयत हा कोंडबावी ता. माळशिरस या गांवचा रहिवाशी असल्याने सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकास मयताचे राहते गांवी जावून मयताबाबत माहिती काढण्याबाबत मार्गदर्शनपर सुचना देवून रवाना केले होते. त्यानुसार सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक सदर गांवी जावून माहिती घेत असताना त्यांना गोपनीयरित्या माहिती मिळाली की, यातील मयत हा दारूच्या पूर्णपणे आहारी गेला होता. मागील अनेक वर्षापासून दारूच्या नशेत घरातील लोकांना शिवीगाळ करून त्रास करत होता. त्या त्रासास कंटाळून सदरचा गुन्हा हा यातील फिर्यादी (मयताचा मुलगा) यानेच केला असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक मयताचे अंतविधीकार्य पूर्ण झाल्यानंतर यातील फिर्यादी (मयताचा मुलगा) यास कोंडबावी येथील राहते घरातून चौकशीकरीता ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता तो विसंगतीने उत्तरे देवू लागला, त्याचेकडे कौशल्यपूर्ण विचारपूस करता त्याने सांगितले की, मयत वडिल हे मागील अनेक वर्षापासून घरातील लोकांना दारू पिऊन सारखे सर्वांना शिवीगाळ व त्रास देत असल्याने त्यांचे त्रासास कंटाळून वडिल घरी आल्यानंतर त्यांना एका खोलीमध्ये कोंडून लोखंडी गजाने तोंडावर, डोक्यावर, ठिकठिकाणी मारहाण करून जिवे ठार मारले असल्याचे सांगून प्रेत एका मोठया पिशवीमध्ये भरून प्रेत पिकअप वाहनात टाकून मयताची मोटार सायकल बहिणीने चालवत नेवून नातेपुते येथील शिंगणापूर भवानी घाटात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देषाने काठाडात टाकून गुन्हा केला असल्याबाबत कबुली दिल्यावरून यातील फिर्यादीस (मयताचा मुलगा) यास नातेपुते पोलिस ठाणेच्या ताब्यात देवून त्यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रविण सपांगे, नातेपुते पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे, . पोलिस अधीक्षक, हिम्मत जाधव, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जून भोसले, पंढरपूर उपविभाग, अतिरिक्त चार्ज अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, सफौ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड यांनी बजावली आहे.


