
पंढरपुर येथील सराईत गुंडांची टोळी सोलापुर ग्रामीण पोलिसांनी केली हद्दपार…
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पंढरपूर येथील सराईत गुन्हेगार कृष्णा नेहतराव व त्याच्या टोळीस केले ०१ वर्षाकरीता तडीपार….
सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये शरीराविषयी व मालाविषयी वारंवार गुन्हे करणारे आरोपींवर प्रतिबंधात्मक करावाई करण्यासाठी “हद्दपार प्राधिकरणाचे कामकाज चालविण्यात येते.
पंढरपूर तालुक्यात कृष्णा सोमनाथ नेहतराव याने एक टोळी तयार केली होती. तो स्वतः तसेच टोळीच्या सदस्या सोबत खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, दहशत माजवणे, वाळू चोरी करणे, अश्या
स्वरूपाचे गुन्हे करून समाजामध्ये दहशत माजवलेली होती. त्याच्या टोळीमध्ये स्वप्निल अरूण आयरे, तसेच रोहित लक्ष्मण अंमगराव असे सदस्य आहेत. त्यांच्या टोळीने गुन्हे करून सामाजीक स्वास्थ बिघवडत असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलिस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलिस ठाणे यांच्याकडून प्राप्त होता. सदर इसमांविरूध्द प्राप्त प्रस्तावाची पोलिस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे यांच्या समक्ष सुनावणी होवून त्यांना सोलापूर जिल्हयातून ०१ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांची नावे


१)कृष्णा सोमनाथ नेहतराव रा. जुनी पेठ, पंढरपूर,

२) स्वप्निल अरूण आयरे, रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर,

३) रोहित लक्ष्मण अंमगराव, रा. रामबाग, पंढरपूर
अशी टोळी आहे. आगामी काळातील होणा-या लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभुमीवर जिल्हयातील सामाजीक स्वास्थ्य बिघडवणारे सराईत गुन्हेगार, दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराची माहिती पोलिस ठाणे निहाय तयार करण्यात आलेली आहे. गुन्हेगारांच्या अभीलेख याबाबत माहिती घेवून नियोजीत प्रतिबंधक कारवाईचा आराखाडा तयार करण्यात आलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभुमीवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे कामकाज सूरू आहे.
सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण,प्रितम यावलकर,अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, अर्जुन भोसले,उपविभागिय पोलिस अधिकारी, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, विश्वजित घोडके, पोलिस निरीक्षक, पंढरपूर शहर
पोलिस ठाणे, प्रकाश भुजबळ, गोसावी, सहा. पोलिस निरीक्षक, तसेच सफौ निलंकठ जाधवर,नापोशि अनिस शेख, पोशि सुरज हेंबाडे, सचिन इंगळे, बंजरग बिचकुले व इतर यांनी केली


