शेंदूरजनाघाट पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना रेती वाहणारा डम्पर जप्त; २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अमरावती ग्रामीण:

शेंदूरजनाघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार गस्तीवर असताना, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पांढुर्णाकडून पुसलाकडे अवैध रीतीने रेतीचा डम्पर येत आहे.



या माहितीच्या आधारे, दिनांक १५/१०/२०२६ रोजी पोहेकॉ वीरेंद्र अमृतकर पोका सागर लेव्हूरकर आणि पोका मदन उईके यांनी आर.टी.ओ. बॅरियर, पुसला ते पंढरी दरम्यान थांबून पांढुर्णाकडून येत असलेला डम्पर (क्रमांक: MH 27 DT 2385) थांबवला.



कारवाईचा तपशील:

  • तपासणी: वाहनाची पंचंसमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना व रॉयल्टीशिवाय रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.



  • आरोपी: रविंद्र रमेशराव वघाडे (वय ३६ वर्षे, रा. पुसला, ता. वरुड, जि. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.

  • जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:



    • डम्पर (क्र. MH 27 DT 2385) किंमत अंदाजे: २०,००,००० रुपये

    • ६ ब्रास रेती किंमत अंदाजे: ४८,००० रुपये



    • एकूण जप्त माल: २०,४८,००० रुपये

गुन्हा दाखल:

आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन शेंदूरजनाघाट येथे  पर्यावरण संरक्षण अधिनियम  जमीन महसूल अधिनियमअन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासात घेण्यात आला आहे.

मार्गदर्शन:

सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक  ए.एन. लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल गवई (ठाणेदार, पोलीस स्टेशन शेंदूरजनाघाट), तसेच पोलीस अंमलदार वीरेंद्र अमृतकर, सागर लेव्हूरकर व मदन उईके यांनी पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!