
दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी एका तासात दोघांना अटक…
दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी एका तासात दोघांना अटक…
पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेऊन उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आणि अंमली पेय पाजून दि.२७ ते २८ एप्रिल रोजी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ड्रग्ज देणारा आणि बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींवर खेड पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार, अल्पवयीन मुलीला अवैध संबंधांसाठी फूस लावणे आणि अंमली पदार्थाचा उपयोग आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२७एप्रिल) रोजी सायं.०५.३० वा ते (दि.२८एप्रिल) रोजी ०१.३० वा पर्यंत. पिडीत निर्भया व तिची मैत्रिण ह्या दोघींना आरोपी नामे अजय भिकेन दौड (वय २९ वर्षे), रा.सातकरस्थळ, ता.खेड, जि.पुणे व आरोपी क्र.२ श्रीराम संतोष होले, (वय २३ वर्षे), रा.होलेवाडी, ता.खेड, जि. पुणे यांनी आपण फिरायला जाऊ असे म्हणुन फुस लावुन त्यांचे ज्या दुचाकीचा नंबर माहित नाही त्या वर बसवून शिरूर येथे नेऊन आरोपी क्र.३ किरण पुर्ण नाव पत्ता माहीत नाही याचे कडुन इंजेक्शन व बोटल घेऊन तेथुन एका डोंगरावर नेवुन तेथे त्यांनी शिरूर येथे आणलेले इंजेक्शन पहिली निर्भया हिला देण्याचा प्रयत्न केला पण हिने इंजेक्शन घेतले नाही. म्हणुन तिच्या मैत्रिणीला तु जर इंजेक्शन घेतले नाही तर तुला इथेच सोडुन जावु अशी धमकी देवुन तिचे दोन्ही हातावर इंजेक्शन देऊन तेथुन मौजे जैदवाडी गावच्या हद्दीत ता.खेड, जि.पुणे येथील एका लॉजवर घेऊन जावुन तेथे लॉजच्या दोन रूम बुक करून आरोपी अजय दौड यांने पहिल्या निर्भयाला एका रूममध्ये नेऊन तसेच आरोपी श्रीराम होले याने तिच्या मैत्रिणीला दुस-या रूममध्ये जबरदस्तीने नेवुन दोघांनीही जबदस्तीने शारीरीक सबंध केले, फुस लावणे, वगैरे मजकुरावरून खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३१०/२०२४ भा.द.वि कलम ३६६ अ, ३७६ (२) (जे), ३२८, ५०६, ३४ सह बाल लैगिंक अत्याचारापासुन बालकाचे संरक्षण २०१२ चे कलम ४, ६, ८, १० प्रमाणे गुन्हा (दि.१६मे) रोजी रात्री दाखल करण्यात आला होता.

यातील आरोपी नामे अजय भिकेन दौड (वय २९ वर्षे), रा.सातकरस्थळ, ता.खेड,जि.पुणे व आरोपी श्रीराम संतोष होले, (वय २३ वर्षे), रा.होलेवाडी, ता.खेड, जि.पुणे यांचा शोध घेण्याकरीता दोन तपास पथके तयार करून त्यांचा गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला असता दोन्ही आरोपींना एक तासाच्या आत जेरबंद करण्यात आले असुन आरोपी किरण पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही याचा शोध घेणेकरीता एक पथक रवाना करण्यात आलेले आहे. सदर आरोपींना न्यायालयाचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यांची (दि.१८मे) पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे,उपविभागिय पोलिस अधिकारी खेड सुदर्शन पाटील, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक खेड पोलिस स्टेशन, महीला पोलिस उपनिरीक्षक माधवी देशमुख, पोलिस उपनिरीक्षक डी.एन.राउत, पोशि रामदास बो-हाडे, नापोशि प्रविण गेंगजे,पोशि. एस. डी बांडे, स्वप्निल लोहार,सागर शिंगाडे, महीला नापोशि निलम वारे, यांच्या पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास महीला पोलिस उपनिरीक्षक माधवी देशमुख नेमणुक खेड पोलिस स्टेशन हे करीत आहेत.


