
म्हशीच्या रेडकुची तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
कत्तलीकरीता अवैधरित्या म्हशींच्या रेडकुची तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 5 आरोपींसह 47,75,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात येत असुन तशा सुचना सर्व प्रभारींनी त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि 23 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की समृद्धी महामार्गावरून अवैधरित्या जनावरांची निर्दयतेने वाहतूक होणार आहे


अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने समृद्धी महामार्ग विरुल परिसरात नाकेबंदी करीत कंटेनर क्रमांक KA 01 AM 8536 ची तपासणी केली असता त्यात काळया रंगाचे म्हैस जातीचे छोटे बछडे या जनावरांना कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन हालचाल करण्यास पुरेशी जागा नसतांना क्रुरतेने आखुड दोरीच्या सहाय्याने बांधुन जनावरांना कोणत्याही प्रकारची हवा व प्रकाश येणार नाही अशा बंदिस्तरित्या झाकुन आतील उष्णतेमुळे व्याकुळ झालेले वेदनादायक स्थितीत निर्दयतेने व क्रुरपणे व त्यांचे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता बांधलेले दिसून आले.

सदर कंटेनर बाबत त्याचा चालक 1) इरशाद इसाक खान, व 32 वर्ष, व्यवसाय – चालक, रा. गांधीग्राम घासेडा जि. नुह (हरीयाणा) 2) अब्दुल सला अब्दुल रशीद, वय 40 वर्ष, धंदा – क्लिनर, रा. दारूशिफा जि. त्रिवेंद्रमपुरम (केरळ) 3) असलम खान इकबाल खान, वय 24 वर्ष , धंदा – क्लिनर रा. गांधीग्राम घासेडा जि. नुह (हरीयाणा) 4) साहुन बठ्ठन, वय 47 वर्ष, रा. बॅगपरी ग्राम, जि. अलवर (राजस्थान) 5) रॅाबिन अख्तर, वय 23 वर्ष, रा. सबलाना जि. भरतपूर (राजस्थान) यांचे ताब्यातून 1) काळया रंगाचे म्हैस जातीचे छोटे बछडे (रेडे) एकूण 51 नग प्रत्येकी किं 25,000/- रूपये प्रमाणे किंमत 12,75,000/-रूपये तसेच सदर बछडे वाहून नेण्याकरीता वापरण्यात आलेला कंटेनर क्र के ए 01 ए एम 8536 किंमत 35,00,000/-रू. असा एकूण 47,75,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर जनावरे ही आरोपी 6) अकबर अली जलाउद्दीन रा. ईलीपाकोनथ्थु, जि. त्रिवेंद्रमपुरम (केरळ) (पसार) यांचे मालकीची असून ती राजस्थान येथून खरेदी करून केरळ येथे अवैधरित्या वाहतूक करून घेऊन जाताना मिळून आली. सदर जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोदय गौषाळा पडेगाव येथे दाखल करण्यात आले असून आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि उमाकांत राठोड, पोहवा हमीद शेख, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अभिषेक नाईक, चालक शिवकुमार परदेशी, अखिलेश इंगळे, रितेश गेटमे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


