
विनापरवाना अतिज्वलनशिल पदार्थाची वाहतुक करणारा सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…
विनापरवाना अतिज्वलनशिल पेट्रोल या द्रव्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्यास सिंदी रेल्वे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान घेतले ताब्यात,त्याच्याकडुन १२० लिटर पेट्रोल केले जप्त…..
सिंदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 17/02/2024 चे 08:30 वा. ते 09:30 वा. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने ठाणेदार पोलिस स्टेशन,सिंदी रेल्वे या आपले पोलिस पथकासह बस स्टॅन्ड चौक, सिंदी रेल्वे येथे कोंबीग ॲापरेशन नाकाबंदी करीत असतांना प्रत्येक वाहन चेक करीत होत्या त्यावेळी एक चारचाकी ईनोव्हा गाडी क्रमांक MH-27 BE 7400 हे वाहन थांबविले असता त्यात चार प्लास्टिकचे डबकीमधे पेट्रोल सारखे अतिज्वलनशिल पदार्थ दिसला सदर संबंधी वाहनचालकाने त्याचे नाव व परवाना विचारला असता त्याने त्याचे नाव


इमरान लियाकत अली सैय्यद, वय 32वर्ष,रा. वार्ड क्र. 02, खडकी, ता. सेलू जि . वर्धा.

असे सांगितले व सदर ज्वलनशील पदार्थासंबंधी कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले यावरुन सदर व्यक्तीस चारचाकी वाहनांसह ताब्यात घेऊन त्याचे विरोधात पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे येथे अप. क्र.71/2024, कलम 3,7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपी इमरान लियाकत अली सैय्यद,यास

1)एक सिल्चर रंगाची चारचाकी ईनोव्हा किंमत 7,00000/-
2)06 प्लास्टिक डबकी मध्ये पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ भरून असलेल्या प्रती डबकी 20 लिटर प्रमाणे एकूण 120 लिटर प्रति लिटर 106 रुपये प्रमाणे एकूण किंमत 12,720/-
3)06 प्लास्टिक डबकी किंमत 50 रुपये प्रमाणे एकूण 300 रुपये असा एकूण जुमला किंमत 7,13,020/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यत आला व पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्यामसुंदर सुर्यवंशी हे करीत आहे
सदरची कामगिरी ही ठाणेदार पोलिस स्टेशन,सिंदी रेल्वे सपोनि वंदना सोनुने,पोलिस उपनिरीक्षक श्यामसुंदर सुर्यवंशी,पोलिस हवा भगत,हरणे,आनंद भस्मे, प्रशांत श्रीवास्तव ,पोशि मुन, सचिन उईके, उमेश खामणकर,, शालिनी नेहारे, प्रीती चंने यांनी केली


