
नाकाबंदी करुन अल्लीपुर पोलिस व स्थागुशा पथकाने पकडला देशी दारुचा साठा…
दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन,अल्लीपुर यांची नाकाबंदी दरम्यान केली संयुक्तिक कार्यवाही, देशी दारूच्या 32 पेटया व कारसह एकुण 8,40,400 /- रू.चा दारूसाठा केला जप्त..,
अल्लीपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारी शिजयंती सन उत्सवाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैधरित्या दारुची वाहतुक व विक्री करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील प्रभारीं तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले होते त्यावरुन
दिनांक 04.02.2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन अल्लीपुर -कानगाव रस्त्यावर एका खासगी वाहनाने अवैध्यरित्या देशी दारूचा माल येत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर


माहिती मिळाल्याने पो.स्टे. अल्लीपुर हददीतील मौजा रोहणखेडा शिवारात रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH-14-EC-9172 हि चारचाकी कार येताना दिसली सदर कारला थांबण्याचा इशारा दिला असता पोलिसाची चाहुल लागल्याने सदर कार चालकाने त्याचे ताब्यातील वाहन पळुन जाण्याचे उद्देशाने बेदरकारपणे चालवुन बाजुला असलेल्या मोठया सिसमच्या झाडाला धडक देवुन स्वतःचे ताब्यातील कारचे नुकसान करण्यास कारणीभुत ठरला. सदर कार चालकास कारचे बाहेर येण्यास सांगुन त्याची व कारची पाहणी करून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव

सौरभ मनोज चौधरी, वय 28 वर्ष, रा. ग्रामपंचायतचे बाजुला बोरगाव मेघे जि. वर्धा,

असे सांगीतले वरून सदर कारची तपासणी केली असता सदर कारमध्ये मागील सिटवर व चालकाचे बाजुचे सिटवर
तसेच कारचे डिक्कीमध्ये खडर्याच्या खोक्यात व प्लॅस्टीक पिशवींमधे देशी दारू गोवा सत्रां न. 1 कंपनीच्या 180 एम.एल.च्या बाटल्या दिसुन आल्या खर्ड्याचे खोक्यात 672 बाटल्या व 09 प्लास्टिक पिशवीमधे 864 बाटल्या असे एकुण 1536 बाटल्या देशी दारू गोवा संत्रा नं. 1 कपंनीच्या बाटल्या अशा एकुण
दारूसाठा किमंत 2,30,400/- रू. व मोबाईल, कारसह एकुण जु.कि. 8,40,400/-रू. चा मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करून कार चालकास दारूमाल कोठुन आणला याबाबत विचारले असता त्याने सदर देशी दारूचा माल हा बाभुळगाव जि. यवतमाळ किंग्स कंन्ट्री बार देशी दारू भटटी येथुन आणल्याचे सांगीतल्याने आरोपी सौरभ चौधरी व बारमालक यांचेविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे अप.क्र. 666/24 कलम 65 (अ) (ई) 77 (अ), 83 म.दा.का. सहकलम 279, 427 भा.दं.वि. सहकलम3(1)181,130/177, 184 मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक. नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हान यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशानुसार स.पो.नि. प्रफुल डाहुले, ठाणेदार पो.स्टे. अल्लीपुर यांचे निर्देशानुसार पोलिस अमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक, गोविंद मुडें सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


