
हद्दपार आरोपींस त्याचे साथीदारासह अवैधरित्या २ गावठी पिस्तुलासह स्थागुशा ने घेतले ताब्यात….
हद्दपार ईसमास त्याचे साथीदारासह अटक करुन त्यांचे ताब्यातुन २ गावठी पिस्तुल व १० जिवंत कारतुस केले जप्त स्थागुशा पथकाची कामगिरी…..
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०४) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून पोलिस रेकॉर्ड वरील हद्दपार आरोपी शेख रहीम शेख रशीद, वय ३८ वर्ष, रा. आनंदनगर, हक्कानिया मस्जीद जवळ, वार्ड नंबर २५, जिल्हा वर्धा, हा वर्धा जिल्हयातून दोन वर्षा करीता हद्दपार असुन तो तारफैल, वर्धा परीसरात श्रीमती साहाना परवीन शेख हिचे घरी आला असुन त्याचे ताब्यात गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र पिस्टल (माउजर)बाळगुन हजर आहे व तो कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे बेतात आहे अश्या माहीतीवरून
श्रीमती साहाना शेख हिचे घराकडे जात असतांना तिचे घरासमोर रोडवर हद्दपार ईसम नामे शेख रहीम शेख रशीद हा सार्वजनीक ठिकाणी रोडवर हातात पिस्टल (अग्नीशस्त्र) घेवून दहशत पसरवित असतांना दिसुन आल्याने त्यास मोठया शिताफितीने ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र पिस्टल (माउजर) ज्यास मॅग्झीन असलेली व मॅग्झीनमध्ये ०५ जिवंत कारतूस मिळुन आले. शेख रहिम यास गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र पिस्टल (माउजर) बाबत विचारणा केली असता त्याने आणखी एक गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र पिस्टल (माउजर) हे श्रीमती साहाना शेख हिचे घरी ठेवलेली असल्याची माहिती दिल्याने लगतच असलेल्या श्रीमती साहाना शेख हिचे घरी जावुन घराची पाहणी केली असता तिचे राहते घरी एक गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र पिस्टल (माउजर) व मॅग्झीनमध्ये ०५ जिवंत कारतुस मिळुन आले. शेख रहीम शेख रशीद याचे कडे गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र पिस्टल (माउजर) सह एकुण १० जिवंत कारतुस जवळ बाळगनेबाबत अधिकृत परवाना नसल्याने त्याचे ताब्यातुन ०२ गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र पिस्टल (माउजर), १० जिवंत कारतूस, ०२ मॅग्झीन व एक मोबाईल असा एकुण जुमला किंमत १,२०,००० /- रु चा मुद्देमाल जप्त केला.
शेख रहीम शेख रशीद यास दोन्ही गावठी बनावटीची अग्निशस्त्र पिस्टल (माउजर) व कारतुसे त्याने कोठुन खरेदी केली याबाबत विचारले असता त्याने आरोपी नामे हमीद तुकूडया शहा वय ४१ वर्ष, रा. आठवडी बाजार,पुलगांव जिल्हा वर्धा, याचे कडुन खरेदी केल्याची माहिती दिल्याने दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन वर्धा (शहर) येथे दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे..
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी शेख रहीम शेख रशीद याचेवर शरीराविरुध्द गंभीर स्वरुपाचे वर्धा जिल्हा अभिलेखावर १५ गुन्हे नोंद असुन नमुद आरोपी हा २ वर्षा करीता वर्धा जिल्हयातुन हद्दपार आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डाँ सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांचे निर्देशा प्रमाणे पोलिस अधिकारी
उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, पोलिस अंमलदार- हमीद शेख, नरेंद्र पाराशर, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, मनोज धात्राक, अरविंद येणूरकर, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, पवन पन्नासे, महादेव सानप, मनिष कांबळे, गोपाल बावणकर,संजय बोगा, अमरदिप पाटील, नितीन ईटकरे, मंगेश आदे, अभिषेक नाईक, विनोद कापसे, गजानन दरणे, गणेश खेबले, अल्का कुंभलकर, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.




