
स्थागुशा पथकाने पकडला २२ किलो गांजा,२ आरोपी ताब्यात…
वर्ध्यात 22 किलो गांजासह दोघांना अटक…
वर्धा (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा तस्करांवर कारवाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कार आणि गांजा असा 12 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री एलसीबीची दोन पथके गस्तीवर असताना, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून दोन आरोपींना अटक केली. या मध्ये


1) अक्षय राजेंद्र कदम, (वय 29 वर्ष), रा.चितळी तह मानखटाव, जि.सातारा ह.मु. घर क्रमांक 23, सह्याद्री हॉस्पिटल समोर, पी.एम.सी. बिल्डींग मागे, बिबवेवाडी तह जि.पुणे,

2) गौरव दिनकर शेंडे, (वय 23 वर्षे), रा.भिवापूर पोस्ट वायगाव (निपाणी) तह जि.वर्धा

यांचा समावेश आहे तर
3) सचिन साठे, रा.धारावीर लेआउट, दत्तपुर चौक, वर्धा (पसार),
4) वाहन चालक अमित पांडे, राहणार वायगाव (निपाणी) तह. जि. वर्धा (पसार),
5) रवींद्र नावाचा इसम, रा. डुगुरीपल्ली, राज्य ओडिसा (पसार)
हे फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 1) 22 किलो 850 ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा किंमत 4,57,000/-₹, 2) पाच वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल किंमत 1,00,000/-₹, आणि 3) एक जुनी वापरती मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच 49 एएस 6182 किंमत 7,00,000/-₹, असा एकूण 12 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलिस स्टेशन सेवाग्राम परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करित असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिल नमूद आरोपी क्रमांक 01 ते 04 यांच्या वर NDPS कायद्यान्वये रेड केली असता आरोपी क्रमांक 1 व 2 हे जागीच मिळून आले व आरोपी क्रमांक 3 ते 4 हे घटनास्थळा वरून पसार झाले. घटनास्थळावर मिळून आलेले आरोपी क्रमांक 1 ते 2 यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच 49 एएस 6182 ची पाहणी केली असता सदर आरोपीचे ताब्यातून वरिल प्रमाणे गांजा अंमली पदार्थ माल 22 किलो 850 ग्रॅम व कार तसेच कार मधील आरोपी क्रमांक 3 याचे दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण जु.किं. 12,57,000/- रुपयेचा माल मिळाल्याने तो जागीच शासकीय पंचांसमक्ष जप्त करण्यात आला, सदर आरोपी यास गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी आरोपी क्रमांक 05 याच्या कडून स्वतः जाऊन खरेदी करून आणल्याचे सांगितले. तसेच आरोपी क्रमांक 3 ते 5 यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. सदर आरोपी क्र.1 व 2 यांना रितसर अटक करुन पाचही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे अप.क्र. 94/24 कलम 8 (क), 20 (ब), ii (ब), 29 NDPS ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नूरुल हसन पोलिस अधिक्षक डॅा सागर रतन कवडे अपर पोलिस अधिक्षक, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनात पोउपनि उमाकांत राठोड, अमोल लगड, शिवकुमार परदेशी, पोहवा गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, पोलिस अंमलदार मनीष कांबळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे.


