
सावंगी मेघे पोलिसांची पारधी बेड्यावर वॅाशआऊट मोहीम,८७ हजाराचा सडवा रसायन केला नष्ट…
सावंगी मेघे पोलिसांची पांढरकवडा पारधी बेड्यावर वॅाशआऊट मोहीम,मोहा सडवा रसायन केले नष्ट….
सावंगी मेघे(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधाने कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी दिले होते


त्याअनुषंगाने आज दिनांक (27)रोजी पोलिस स्टेशन,सावंगी मेघे येथील पथकाने छापा घातला असता सदर ठिकाणी नमूद आरोपी 1) रेषींदा उर्फ चंपी सखाराम फुलमाळी, वय 36 वर्ष 2) इंद्रपाल उर्फ इंद्रधनु राजु भोसले, वय 45 वर्श. दो. रा. पांढरकवडा पारधीबेडा, ता. जि.वर्धा हे मानवी आरोग्यास हानिकारक अशी गावठी दारू मोहा फुलाची ज्यामध्ये युरिया, बेशरम झाडाचा पाला, बॅटरी सेल मधील रस मधील रसायन तुरटी गुळ यांचे सर्वांचे रसायन तयार करून त्यातून अधिक नशा येणारे अशी दारूची हातभट्टी लावून मानवी शरीरास अपाय कारक दारू काढताना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून व मोक्यावरून दारूभट्टी साहित्यसह किंमत 87,770/- रु चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून दोन्ही आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे अप क्र.- 154/2024 कलम 328 भा.दं.वि. सहकलम 65 बी. सी. एफ. ई 83 मदाका नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपींचे ताब्यातुन 1) 50 लिटर उकडता सडवा रसायन किंमत 5,000/-रू तसेच दारूभट्टीचे लोखंडी ड्रम किंमत 200/-रू.असा ड्रम सह कि 5,200 2) एका प्लास्टीक डबकीत अंदाजे 3 लिटर गावठी मोहा दारू डबकीसह किंमत 400/- रू 3)कच्चासडवा रसायनाने भरलेले 8 लोखंडी ड्रम ज्यामध्ये प्रत्येकी 100 लिटर प्रमाणे 800 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन लोखंडीड्रम कि. 1600/- असा ड्रमसह किंमत 81,600/-रू 4) दोन किलो युरिया किंमत 20/-रू. अंदाजे 1 किलो तुरटी किंमत अंदाजे50/- रू.बॅटरी सेल मधील रसायन अंदाजे अर्धा किलो व बेशरम झाडाचा पाला तसेच दारू भट्टी वरील जर्मनघमेलासह इतर भट्टी साहित्ये किंमत 500/-रू. एकुण 570/-रु. असा एकुण कि. 87,770 /- रु. चा माल जप्त करण्यात आला व सडवा रसायन नाश करण्यात आले

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे,ग्रेड पो उपनिरीक्षक सतीश दुधाने,सफौ नबी चांद,पोहवा संजय ताटे,पोलिस अंमलदार निखील फुटाने,अनिल वैद्य,भगीरथ भेंडे यांनी केली



