
सेवाग्राम पोलिसांचा आदर्शनगर परीसरात मोहादारु भट्टीवर छापा,लाखोंचा मोहासडवा केला नष्ट
सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत आदर्शनगर परीसरात अवैध मोहादारु भट्ट्यावर सेवाग्राम पोलिसांचा छापा,लाखोंचा मोहासडवा केला नष्ट….


सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या

त्याअनुषंगाने आज दि(५) रोजी ठाणेदार पोलिस स्टेशन सेवाग्राम सहाय्यक पोलिस निरीक्षक विनीत घागे यांना गोपनीय माहीती मिळाली की हद्दीतील आदर्शनगर परीसरात दिनेश नामक ईसम अवैधरित्या मोहा रसायन याच्या सडव्याचा वापर करुन मानवी शरीरास हानीकारक असे मोहादारुची निर्मीती करीत आहे त्यानुसार ठाणेदार यांनी आपले अधिनस्त असलेले पोलिस पथकासह दुपारी ३.३० ते ४.३० वा चे दरम्यान सदर मिळालेल्या माहितीच्या आधारे नमुद स्थळी जाऊन विशेष मोहीम राबवून 10 ड्रम (2000 लिटर) मोहा सडवा ,इतर 04 ड्रम ,100 लिटर मोहा दारू तसेच इतर साहित्य असे एकूण 1,51,000/- रु चा माल जप्त करण्यात आला असून आरोपी दिनेश यादव व इतर यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर मोहादारु भट्टीचा चालक/मालक दिनेश यादव याला अटक करुन ताब्यात घेण्यात आले व पुढील तपास सुरु आहे

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन सेवाग्राम सहा.पोलिस निरीक्षक विनित घागे,पोउपनि उईके,सफौ लसुंते,पोहवा पाऊलझाडे,नितीन राजपुत,पोशि नेहारे व सैनिक यांनी केली


