पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने पकडला अवैध दारुसाठा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात,वाहनासह ८ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…..

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात शांतता राहावी त्याअनुषंगाने कुठलेही अवैध धंदे खपऊन घेतले जाणार नाही त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करा अश्या सुचना वजा आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना दिल्या





त्यानुसार आज दि. 26.02.2024 रोजी पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकानें पोलिस स्टेशन देवळी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना माहीती मिळाली की देवळी येथील आंबेडकर नगर ले आऊट परीसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर छापा टाकुन



1) एक मारुती स्विफ्ट vdi कार क्र MH 34 AM 6031 किँमत 7,00,000/- ₹



2)180 मिली चे प्रीमियम कंपनीचे देशी दारूने भरलेल्या एकूण 25 पेटी मध्ये एकूण 1200 बॉटल किँमत 1,80,000/-₹

असा एकूण 8,40,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी भिमजय नरेंद्र म्हैसकर वय 40 वर्षे रा. आंबेडकर नगर देवळी याचे विरुद्ध पोलिस स्टेशन देवळी येथे दारूबंदी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात विशेष पथक प्रमुख सपोनि मंगेश भोयर, अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, अभिजित गावंडे, संदीप गावंडे, प्रदीप कुचणकर चालक पोशि शुभम बहादुरे यांनी  केली

 

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!