
कारंजा घाडगे पोलिसांनी पकडला प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु(गुटखा)….
कारंजा (घा)वर्धा- कारंजा शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधपणे विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना होताच त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली. यात दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार दिनांक ५ रोजी उशीरा करण्यात आली. गोपाल नासरे व अमोल झोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कारंजा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. यावरून स्थानिक पोलिसांनी व वर्धा येथील अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकारी यांनी संयुक्तपणे सापळा रचून शहरातील खडींपूरा भागाजवळील झोरे यांच्या शेतातील
गोठ्यावर छापा मारला. यात दीड लाख रुपयांचा ११० किलो सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी राजेश यादव व ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्री कुटेमाटे, पोलिस उपनिरीक्षक गिरीधर पेंदोर सहाय्यक फौजदार विनोद वानखेडे ,नायक पोलिस शिपाई नितीन वैद्य यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अटकेतील आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


