आष्टी पोलिसांनी साहुर शिवारात राबविली वॅाश आऊट मोहीम….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

आष्टी पोलिसांची वर्धा नदीच्या किनाऱ्या वरीस मौजा साहुर-जाम नदीपात्रा काठी राबविली वॅाशआऊट मोहीम…..





आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,,पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात सर्व पोलिस निरीक्षक यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.



अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक ९/३/२०२४ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, संजय पंडीत पवार हा मौजा साहुर जाम नदीकाठी शरीरास घातक अशा मोहादारुची निर्मित करीत आहे अशा खात्रीशीर बातमीवरुन सदर माहितीची शहानिशा करून आ रोजी सकाळी ०७:०० ते ०८:३० वाजेदरम्यान मौजा साहूर जाम नदीकाठी वॉशआउट मोहीम राबविण्यात आली
सदर वॉश आउट मोहीमेत १२ प्लॅस्टिक ड्रम मधील २४०० लिटर कच्चा मोहा सडवा तसेच ४० टिनाच्या पिप्यातील ६०० लिटर कच्चा मोहा सडवा व इतर सामान असे एकूण १,५६,८००/-रु चा मुद्देमाल नाश करण्यात आला व  संजय पंडित पवार वय ५० रा पारधीबेडा साहूर याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,आर्वी खंडेराव दरणे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरीक्षक सुनील पवार,पोउपनि दौंड,पोहवा वडनेरकर,घावट,पाटील,
पोशि काळूसे,केंद्रे व गृह रक्षक दलाचे जवान





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!