पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने वाळुमाफीयांना दणका,दोन कोटीचेवर मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

र्धा पोलिसांचा वाळू माफियांना दणका; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, २३ जणांवर गुन्हे दाखल…

वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन, उपसा आणि त्याची होणारी वाहतूक सर्रास सुरू असल्याचे कारवाईतून पुन्हा सिद्ध झाले आहे. पोलिस अधीक्षक नूरूल हसन आणि अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांच्या पथकाने सहा.पोलिस अधिक्षक राहुल चव्हान,परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक ऋुष्टी जैन यांनी केलेल्या कारवाईत जेसीबी, महिंद्रा बोलेरो, हुंडई क्रेटा, मारुती वेगेनार, टाटा इंडिका व्हिस्टा, रेतीने भरलेले टिप्पर मोबाईल आणि नगदी पैसे असा सुमारे २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून २३ जणांवर पुलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोउपनि. दिपक निंबाळकर पोलिस स्टेशन, पुलगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप क्र २३२/२०२४ कलम ३७९, ५११, १०९, ३४ भादवि सहकलम १३०/१७७ मोवाका ३(१)/१८१, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी वाळूमाफियांविरुद्ध केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.





या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आहे की, नमुद घटने वेळी यातील फिर्यादी यांना मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, मौजा- सालफळ शेत शिवारात असलेला वर्धा नदीवरील रेती घाट मध्ये टिप्पर मध्ये जे.सी.बी. ने अवैधरित्या रेतीचे भरुन वाहतुक करीत आहे. अशा मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगांव राहुल चव्हान व पोलिस निरीक्षक प्रमोद बांबळे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात दोन पंच व पोलिस पथकासह नमुद स्थळी गेले  असता यातील आरोपी हे संगणमताने जे.सी.बी च्या सहाय्याने वाळु टिप्परमध्ये भरताना दिसले. त्या वाळु डेपोमध्ये १० टिप्पर उभे दिसले त्यामध्ये ८ टिप्परमध्ये वाळु भरलेली दिसली. तसेच दोन खाली टिप्पर हे वाळु भरण्याच्या उद्देशाने उभे दिसले.



यातील मुख्य आरोपी रवि भानुदास चिखलकर (वय ५२ वर्षे), रा.वल्लभनगर गुंजखेडा याला पंचासमक्ष रात्रीला रेती वाहतुक करण्याची परवानगी आहे का असे विचारले असता. त्याचेकडे रात्रीला रेती वाहतुकीचा किंवा साठवणुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितल्याने मोक्यावरून पंचासमक्ष डेपो आवारातील १ जे.सी.बी. १० टिप्पर, ४ चारचाकी वाहने व एक टि.व्ही.एस जुपिटर मोपेट चे डिक्कीत असलेले नगदी ७२,०००/- रुपये व २२ मोबाईल असा एकूण किंमत २,१५,९४,५००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने  पंचनाम्याप्रमाणे जप्त करून आरोपींविरूध्द सदरचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. सदर गुन्हयातील आरोपींकडुन एकुण २,१५,९४,५००/- रु. चा माल मिळुन आल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक, राजु सोनपितरे, पोहवा. राजेंद्र हाडके, पोहवा. विनोद रघाटाटे हे करीत आहे. यात अटक करण्यात आलेले  आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –



१) चेतन प्रमोदराव वानखेडे (वय ३५ वर्ष), रा.संभाजी नगर आर्वी

२) जगदिश नानाजी नेवारे (वय ४३ वर्ष) रा.जनता नगर आर्वी

३) विशाल प्यारेलाल पाचे (वय ३० वर्ष) रा.गुंजखेडा

४) गणेश रमेश एतवान (वय ४९ वर्ष), रा.वाल्मी नगर पुल गांव

५) इंद्रजित रमेशराव पांगोटे (वय ४९ वर्ष) रा.तेलघाणी पसरली गाव

६) नथ्थु लक्ष्मणराव चुटे (वय ५९ वर्ष), रा.गौरक्षण पुल गाव

७) प्रविण जुगलकिशोरया (वय ३८ वर्ष), रा.हरीराम नगर पुलगांव

८) श्रावण विश्वनाथ सपाटे (वय ५७ वर्ष), रा.खडकपुरा नाचणगांव

९) गजानन महादेवराव निवेकर (वय २७ वर्ष) रा.सरस्वती नगर पुलगाव

१०) अनिल विलासराव पाटील (वय ४५ वर्ष), रा. व-हा कु-हा, ता.तिवसा

११) लक्ष्मण तुळशीराम चौधरी (वय ३५ वर्ष), रा.चांदुर रेल्वे

१२) रवि भानुदास चिखलकर (वय ५२ वर्ष),रा.वल्लभनगर गुंजखेडा

१३) प्रविण सुर्यभान ढानके (वय ४० वर्ष), रा.सालफळ

१४) आसिफ मकसूद अहमद सिद्दकी (वय ३४ वर्ष), राकीर हुसेन कॉलनी

१५) हकीम सैबुद्दीन बोहरा (वय ३४ वर्ष), रा.राठी मार्ग बोरा गल्ली पुल गाव

१६) मोरेश्वर वासुदेव डेहनकर (वय ५४ वर्ष), रा.सालफळ

१७) पंडीत भगवान हानके (वय ५६ वर्ष), रा.सालफळ

१८) दिनेश नामदेवराव मेश्राम (वय ३७ वर्ष), रा.वडगाव (पांडे), ता.आर्वी

१९) हरिहर गुरुनाथ बेंद (वय १९ वर्ष), रा.डबारीया, जि. बहुमा (बिहार) ह.मु. सालफळ रेती डेपो

२०) पंकज रामभाउ सहारे, (वय ३२ वर्ष) रा.मंगरुळ दस्तगीर

२१) लाहनु बापुराव धुर्वे वय (५५ वर्ष), रा. गुंजखेडा

२२) शेख गफ्फार शेख रमजान (वय ५९ वर्ष), रा.हिवरा हाडके

२३) रोशन वसंतराव ठाकरे (वय ३५ वर्ष) रा.हरिराम नगर पुलगाव यांचे ताब्यातुन  पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला

१) जे.सि.बी क्र. एम.एच ३२ पी ५८३८ ची किंमत २५,००,०००/- रुपये
२) हुंडई क्रेटा क्रमांक एम.एच ४० सि.क्यु ८८११ किंमत १५,००,०००/- रुपये
३) महिन्द्रा बोलेरो क्रमांक एम.एच ३२ ए.एस. ८३१६ किंमत १५,००,०००/- रुपये
४) मारुती व्हेगेनार क्रमांक एम.एच २९ आर ३६२६ किंमत
४,००,०००/- रुपये
५) टाटा इंडिका व्हिस्टा क्रमांक एम.एच ३२ सी ३३८२ किंमत २,००,०००/- रुपये
६) टि.व्हि. एस ज्यपीटर क्रमांक एम. एच ३२ ए.एम ००६९ किमतं ८०,०००/- रुपये
७) वाळुने भरलेले टिप्पर क्रमांक एम.एच २७ एक्स ८४२१ किंमत १५,००,०००/- रुपये वाळु किंमत ३०,०००/- रुपये

८) वाळुने भरलेले टिप्पर क्रमांक एम.एच ३२ ए.जे. ५५०१ किमत १५,००,०००/-रुपये वाळु किंमत ३०,०००/- रुपये

९) वाळुने भरलेले टिप्पर क्रमांक एम.एच २७ एक्स ६६७९ किंमत १५,००,०००/- रुपये वाळु किंमत ३०,०००/- रुपये

१०) वाळुने भरलेले टिप्पर क्रमांक एम.एच ४८ टी १८२८ किंमत१५,००,०००/- रुपये वाळु किंमत ३०,०००/- रुपये

११) वाळुने भरलेले टिप्पर क्रमांक एम.एच ३२ क्यु २१५० किंमत १५,००,०००/- रुपये वाळु किंमत ३०,०००/- रुपये
१२) वाळुने भरलेले टिप्पर क्रमांक एम.एच २७ एक्स ५६३५ किंमत १५,००,०००/- रुपये वाळुची किंमत ३०,०००/- रुपये

१३) वाळुने भरलेले टिप्पर क्रमांक एम.एच २९ टी १३६० किंमत १५,००,०००/- रुपये वाळु किंमत ३०,०००/- रुपये

१४) वाळुने भरलेले टिप्पर क्रमांक एम.एच २९ झेड ३९६९ किंमत १५,००,०००/- रुपये वाळु किंमत ३०,०००/- रुपये

१५) खाली टिप्पर क्रमांक एम. एच ३२ क्यु ८००८ किंमत १५,००,०००/- रुपये
१६) खाली टिप्पर क्रमांक एम.एच ३६ एफ १६४७ किंमत १५,००,०००/- रुपये,
१७) नगदी ७२,०००/-रु.

याव्यतिरीक्त एकुन  २२ मोबाईल जप्त करण्यात आले असुन ते खालीलप्रमाणे

१) कार्बन कंपनीचा कि-पॅडचा लाल काळ्या रंगाचा मोबाईल किं.५००/- रुपये

२) लावा कंपनीचा कि-पॅड काळ्या रंगाचा मोबाईल किं. ५००/- रुपये

३) विवो कंपनीचा स्मार्ट फोन किं.५,०००/- रुपये

४) सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन किं.५,०००/- रुपये

५) शामी कंपनीचा स्मार्ट फोन किं.५,०००/- रुपये

६) सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन किं.५,०००/- रुपये

७) ओप्पो कंपनीचा स्मार्ट फोन किं.५,०००/- रुपये

८) नोकिया कंपनीचा कि-पॅडची किं. ५००/- रुपये

९) विओ कंपनीचा स्मार्ट फोन किं.५०००/- रुपये,

१०) विओ कंपनीचा स्मार्ट फोन किं. ५०००/- रुपये,

११) सँमसंग कंपनीचा स्मार्टफोन किं.५०००/- रुपये,

१२) रेडमी कंपनीचा स्मार्टफोन किं. ५०००/- रुपये,

१३) सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन किंमत ५०००/- रुपये,

१४) ॲपल कंपनीचा स्मार्टफोन किंमत २०,०००/- रुपये,

१५) सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन किं. ५०००/- रुपये,

१६)ओपो कंपनीचा स्मार्ट फोन किं. ५०००/- रुपये,

१७) जियो कंपनीचा किपॅड फोन किं. ५००/- रुपये,

१८) वोपो कंपनीचा स्मार्ट फोन किं. ५०००/- रुपये,

१९)ओपो कंपनीचा स्मार्ट फोन किं. ५०००/- रुपये,

२०) वियो कंपनीचा स्मार्ट फोन किं. ५०००/- रुपये,

२१) सिलुरर कंपनीचा किपँड फोन किं. ५००/- रुपये,

२२) रेडमी कंपनीचा स्मार्ट फोन किं. ५०००/- रुपये,

असा एकुण किंमत २,१५,९४,५००/-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक, डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, पुलगाव राहुल चव्हाण, परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक ऋष्टी जैन यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन, पुलगाव येथील पोलिस निरीक्षक, प्रमोद जी. बानवले, पोलिस उपनिरीक्षक, दिपक निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक, राजु सोनपितरे, पोलिस  उपनिरीक्षक, घनश्याम जाधव, पोहवा, सुधीर गुळकर, पोहवा.रितेश गुजर, रामदास दराडे, शुभम कावडे, प्रणय इंगोले व पोलीस मुख्यालय वर्धा येथील पथक यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!