
सहा पोलिस अधिक्षकांचे पथकाचा देवळी येथील दारुविक्रेत्यावर छापा,लाखोचा दारुसाठा जप्त…
विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने देवळी येथील दारू विक्रेत्यावर सहा.पोलिस अधिक्षकांचे पथकाचा छापा, साडेतीन लाखांचा दारुसाठा केला जप्त…
देवळी(वर्धा)प्रतिनिधी – आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता बर्याच दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील जिल्ह्रातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्रात अवैद्यरित्या देशी विदेशी दारुचा पुरवठा करून जिल्ह्राच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते त्याद्वारे मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकुन निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण होत असतो म्हनुन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अशांवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले होते


त्याअनुषंगाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हान यांचे पथकाने देवळी येथे मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन दारू विक्रेत्यावर कारवाई करून 3 लाख 61 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.सदर दारू विक्रेता फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या प्रकरणी फिर्यादी देवळी पोलिस ठाण्याचे पोहवा कुणाल हिवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळी पोलिस ठाण्यात भा.दं.सं.921/2024 कलम 65 (ई), 77 (अ), महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या बाबत सविस्तर वृत्त असे कि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक हे अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाईसाठी उपविभागात गस्तीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून यातील आरोपी रवी पारिसे,रा.आंदोरी, ता. देवळी या दारू विक्रेत्याच्या अड्डयावर धाड टाकून पोलिसांनी 30 खाकी रंगाचे खरडयाचे खोक्या मध्ये देशी दारूने भरून असलेल्या 180 एम.एल. च्या 1440 निपा प्रति निप 150/- रू प्रमाणे, कि.2,16,000/-, एका खाकी रंगाचे खरड्याचे खोक्यात ओ.सी. ब्लयु दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 48 निपा प्रति निप 250/- रू प्रमाणे, कि. 12,000/-, 11 प्लास्टिक कॅन, प्रति कॅन 35 लिटर प्रमाणे 385 लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर 200/- रू प्रमाणे किंमत 77,000/- रू., 11 प्लास्टिक कॅन प्रति कॅन किंमत 500/- रू प्रमाणे 5500/- रू., एक जुना वापरता लॉईड कंपनीचा फिज किंमत 15,000/- रू., दारू विकीचे नगदी 35,980/- रू., असा एकुण कि.3,61,480/- रु मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हाण,यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन देवळी. रविंद्र शिंदे,पोउपनि प्रेमराज अवचट, स.फौ.दिपक जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी, कार्यालय पुलगांव येथील पोलिस अंमलदार सुभाष गावड, संदीप बोरबन,उमेश बेले, पो.शि.रामदास , शुभम कावळे, भुषन हाडके, प्रविण घनमोडे, पो.शि. मनोज नप्ते, पोलिस स्टेशन देवळी यांनी केली आहे.


